आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Vehicle Runs On Mobile Use, License Cancellation

वाहन चालवताना मोबाइलवर बोलल्यास तीन महिने परवाना रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्यास तीन महिने वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश राज्य परिवहन विभाग आणि पोलिसांना प्राप्त झाले आहेत. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्ता सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १७ डिसेंबरला नागपूर येथे घेतलेल्या रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत या अनुषंगाने निर्णय घेतला होता. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये वाहनचालकाप्रमाणेच मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. विनाहेल्मेट वाहनचालकावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. हेल्मेटच्या नियमाचा भंग केल्यास तडजोड शुल्क वसूल करण्यापूर्वी अशा व्यक्तीस रस्ता सुरक्षाविषयक नियमाच्या समुपदेशनासाठी उपस्थित राहणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. सीट बेल्टविषयक नियमातही समुदेशन सक्तीचे केले आहे. तसेच काय कारवाई केली, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तीन महिन्यांनंतर परिवहन कार्यालयात अहवाल द्यावा लागणार आहे.

वाहनधारकांचे करणार समुपदेशन : सीटबेल्ट नसणे किंवा विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. ब्रह्माकुमारीज या एनजीओसोबत रस्ता सुरक्षा नियमांबाबत समुपदेशन वर्ग चालवण्याचा करार परिवहन विभागाने केला आहे. कारवाई करण्यात आलेल्या वाहनधारकाला दोन तास या समुपदेशन वर्गास उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे. असे केल्यावरच कारवाई टाळता येईल, असेही आदेशात नमूद आहे.

हे नियम मोडल्यास महिने परवाना रद्द
Áविहित मर्यादे पेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे.
Áमार्गावरील चौकात सिग्नल असतानाही वाहनचालकाने तो ओलांडून जाणे.
Áमालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे.
Áमालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे.
Áमद्यपान करून किंवा अमली पदार्थाचे सेवन करून चालकाने वाहन चालवणे.
Áवाहनचालवताना मोबाइलचा वापर करणे.