आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेकलेले पैसे वेचताना युवकाचे दीड लाख लंपास, चोरट्यांनी लढवली शक्कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दुचाकीवरून आलेले दोन चोरटे म्हणाले, "दादा तुझे पैसे पडले, ते उचल.' युवक लाख ५७ हजार रुपयांची पिशवी दुचाकीला तशीच ठेवून १० रुपयांच्या चार नोटा वेचू लागला. तोच चोरट्यांनी डाव साधला आणि युवक पाठमोरा असतानाच पैशाची पिशवी घेऊन पळ काढला. ही घटना केडिया प्लॉटमधील विजय एजन्सीसमोर शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.

रतनलाल प्लॉट येथे स्वस्तिक फर्निचर दुकानाच्या वरच्या मजल्यावर प्रग्या एन्टरप्राइजेस नावाचे एअरटेल कंपनीचे डीटीएच कंपनीचे सिमकार्ड विक्रीचे कार्यालय आहे. या कार्यालयात दररोज लाखोंची उलाढाल होते. येथे पाच ते सहा कर्मचारी काम करतात. बँक लवकर बंद होईल, म्हणून सकाळी ११ वाजता कार्यालयाचे प्रमुख सय्यद नदीम यांनी लाख ५७ हजार रुपये महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी चार-पाच महिनेच कामावर लागून झालेल्या पवन संभाजी साबणे (वय २४) रा. संभाजीनगर, आदर्श कॉलनी या युवकाला पाठवले. पवनने लाख ५७ हजार रुपये असलेली हिरव्या रंगाची पिशवी दुचाकीला लटकवली आणि बँकेच्या दिशेने निघाला. १०-१० रुपयांच्या नोटा उचलताना त्याने गाडीला लटकवलेली पैशाची पिशवी तशीच ठेवत पैशाच्या मागे सुटला. तेवढ्यात चोरट्यांनी गाडीला लटकवलेली पिशवी काढली आणि पवन पाठमोराच असताना पळ काढला. ४० रुपये जमा करून पवन दुचाकीजवळ आला असता त्याला पैशाची पिशवी दिसली नाही. त्यानंतर तो गांगरला आणि इकडे तिकडे पाहू लागला. पण, चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती रामदासपेठ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर रामदासपेठ पोलिस आणि सिव्हिल लाइन्स पोलिस दाखल झाले. पोलिसांनी या वेळी नाकाबंदी करून चोरट्याचा शोध घेतला. मात्र, त्यात त्यांना यश आले नव्हते. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी पवन संभाजी साबणे या युवकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जास्तीची लूट वाचली
दररोजएअरटेल डीटीएचच्या कार्यालयाचा व्यवहार जनता बँक ते महाराष्ट्र बँक असा असतो. त्यामुळे त्यांनी शनिवारी जनता बँकेतून रक्कम आणली नसल्याने लाख ५७ हजार रुपयेच त्यांच्याकडे होते. जर जनता बँकेतून आणलेल्या रकमेचा समावेश असता तर अडीच ते तीन लाख रुपयाने लुटले गेलाे असतो, अशी माहिती कार्यालयाचे प्रमुख सय्यद नदीम यांनी दिली.