आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराणा दुकान फोडणारा चोरटा गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सिटीकोत वाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये किराणा दुकान फोडणाऱ्या चोरट्याचा माग काढण्यात सिटी कोतवाली पाेलिसांना यश आले आहे. त्यांनी वसमत जि. हिंगोली येथून एका आरोपीला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन हजार रुपये नगदी आणि तीन हजार रुपयांचा किराणा माल ताब्यात घेतला आहे.

११ नोव्हेंबर रोजी गांधी रोडवरील भरत निहालवंद संतानी यांचे किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. या घटनेची तक्रार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दुकानफोडीतील आरोपी वसमत हिंगोली येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणेदार अनिरुद्ध अढाव यांच्या नेतृत्वात तपास पथक गठित करून पोलिस हेडकॉन्स्टेबल श्याम शर्मा, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश इंगळे, इमरान खान यांची एक टीम वसमत आणि हिंगोली येथे गेली. त्यानंतर आरोपी शेख अफरोज शेख अफसर हा नांदेड येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आपला मोर्चा नांदेड येथे वळवून शेख अफरोज शेख अफसर याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक केली असून, त्याच्याकडून पोलिसांनी तीन हजार रुपये रोख आणि तीन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले अाहेत.
चाेरट्याला पकडल्यानंतर उपस्थित पाेलिस.

यापूर्वीही केली चोरी; गुन्ह्यांचा हाेणार उलगडा
शेख अफरोज शेख अफसर याला सिटी कोतवाली पोलिसांनी यापूर्वीही दुकानफोडीच्या दोन घटनांमध्ये ताब्यात घेतले होते. त्याच धर्तीवर पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले. आता पोलिस कोठडीत तो आणखी किती गुन्ह्यांचा उलगडा करतो, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.