आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याचे आमिष दाखवून आठ लाख घेऊन पोबारा; तासाभरातच दोन आरोपींना ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- वीस लाख रुपयांत दोन किलो सोने देतो म्हणत एका व्यक्तीस आठ लाख रुपयांनी लुटल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन फाट्यानजीक घडली. याप्रकरणी पोलिसांनी तासाभरात घटनेतील चार आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेतले. 


मराठवाड्यातील कोळेगाव ता. जाफ्राबाद जि. जालना येथील निवृत्ती उर्फ बंडू प्रल्हाद शेळके वय ३६ यांची सासरवाडी चांगेफळ ही आहे. चांगेफळ येथीलच शिवशंकर सखाराम शिंदे वय ४३ याने निवृत्ती शेळके यांना २० लाख रुपयांत दोन किलो सोने देण्याचे आमिष दिले होते. त्यासाठी अॅडव्हान्स म्हणून आठ लाख रुपये देण्यासाठी निवृत्ती शेळके, त्यांचे सासरे मुरलीधर म्हस्के शिवशंकर शिंदे हे तिघे २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास चिखली येथून सावखेड तेजन फाट्याजवळ चारचाकी गाडीने पोहोचले. तिथे एकमेकांना सोने नोटा दाखवण्यात आल्या. त्यानंतर शिवशंकर शिंदे हा सोने घेऊन येतो, म्हणत नोटा घेऊन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडा झुडपांमध्ये गेला. थोड्याच वेळात शिवशंकर शिंदे रिकाम्या हाताने परतला सोने दाखवणाऱ्यांनी आठ लाख रुपये रक्कम लुटून नेल्याचे गाडीतील निवृत्ती शेळके मुरलीधर म्हस्के यांना सांगितले. तत्काळ तिघांंनीही सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार कथन केला. 


ठाणेदार बळीराम गीते यांनी योजनाबद्ध रीतीने पीएसआय संतोष नेमणार, शिवाजी शिंगणवाड, जमादार रमेश गोरे, राजू घोलप, रामदास वैराळ, विनोद वैद्य आदिंच्या सहाय्याने चौकशी तपास केला फिर्यादी निवृत्ती शेळके यांच्या सोबत असलेला मुख्य आरोपी शिवशंकर शिंदे त्याचा सहकारी सुनिल चव्हाण रा. देवखेड ता. सिंदखेडराजा यांना अटक केली. तर या घटनेतील इतर दोघे आरोपी अंकुश भालेराव रा. खामगाव - खापरखुटी ता. सिंदखेडराजा अमोल जाधव सिंदखेडराजा हे रक्कम घेऊन फरार झाले आहेत. त्यांचाही तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वेळोवेळी अशा घटना उघडकीस येत असतात. तरीही आमिषांपोटी लोक फसवणुकीला बळी पडत असल्याची चर्चा रंगत आहे. 

बातम्या आणखी आहेत...