आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर आमदार शर्मा यांना घेराव घालणार, महानगराध्यक्ष मदन भरगड यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खोलेश्वरमधून जाणारा पूल हा निकृष्ट दर्जाचा झाला आहे. उद्घाटनाआधीच रस्ता उखळला आहे. हे काम आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधीतून झाले आहे. या कामाची चौकशी व्हावी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत असल्यामुळे नवीन रस्त्याची निर्मिती व्हावी, अन्यथा आपण आमदार शर्मांना शहरात प्रत्येक ठिकाणी घेराव घालू, असा इशारा काँग्रेसचे महानगराध्यक्ष मदन भरगड यांनी दिला. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

किराणा बाजारातील व्यापाऱ्यांना शहराबाहेर जाण्यासाठी भाजप दुटप्पी भूमिका बजावत आहे. शहरातील एक आमदार म्हणतात, शहराबाहेर जाऊ नका आणि गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणतात की शहराबाहेर जा, अशी भूमिका भाजप घेत असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मरण होत आहे. त्यांच्याशी सलोखा ठेवून निर्णय घेणे आवश्यक असताना तसे होत नाही, असा आरोप भरगड यांनी केला. खोलेश्वरमधील रस्त्यावर वाहतूक विस्कळीत होत असल्यामुळे दिवसातून बऱ्याचदा येथे भांडणे होत आहेत. त्यामुळे खोलेश्वरवासी त्रस्त झाले आहेत. पर्यायी रस्ता केल्यास तीव्र आंदोलन करून आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानासमोर महिनाभर धरणे देण्यात येणार आहे. त्यावरही तोडगा निघाला नाही, तर आमदार गोवर्धन शर्मा यांच्या शहरातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांना घेराव घालणार आहोत, असेही मदन भरगड म्हणाले.
मदन भरगड