आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाम फोडले, सहा लाख रुपयांचे तांब्यापितळचे भांडे केले लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पातूररोडवरील हिंगणाजवळ असलेल्या तांब्या -पितळाचे भांडे असलेले गोदाम चोरट्यांनी फोडले. त्यातून त्यांनी सहा लाख रुपये किमतीचे भांडे चोरून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रकांत अॅण्ड सन्स ब्रदर्स नावाने असलेल्या गोदामात दिवाळी निमित्त भांड्याचा स्टॉक करण्यात आला आहे. येथून भांडे नेवून शहरात व्यवसाय केल्या जातो. सोमवारच्या रात्री चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागून असलेल्या शेतातून गोदामाचे मागच्या दिशेने असलेले टिनपद्धे उचलून गोदामात प्रवेश केला.

कोदामात ठेवलेले ८०० किलो कॉपर , पितळचे पाच बंडल, कास्टींगचे दोन बंडल आणि स्रॅपचे २० बंडलसह सहा लाख रुपयांचा माल चोरांनी चोरून नेला.
बुधवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार रियाज शेख, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने, फिंगर एक्स्पर्ट, श्वानपथकाने घटनास्थळाचे निरीक्षण केले. मात्र चोरटयांचा थांगपत्ता लागला नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

गोदामात चौकीदार, त्यांना थांगपत्ताही नाही
गोदामात दोन चौकीदार कार्यरत होते. दोघेही समोर झोपलेले असल्यामुळे चोरट्यांनी गोदामाच्या मागून टिनपत्रे काढून भांडे चोरून नेले. मात्र त्यांना घटनेचा थांगपत्ताही लागला नाही.

बातम्या आणखी आहेत...