आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ; पाेलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर - अकोला नाकापरिसरातील घर फोडून चोरट्यांनी एक लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजतादरम्यान उघडकीस आली.

आखरेनगरातील अब्दुल गफ्फार अन्सारी त्यांच्या कुटुंबीयांसह १५ ऑगस्टला मध्यप्रदेशमधील हर्दा येथे गेले होते. १८ ला रात्री १० वाजता ते घरी परतले. मुख्य दाराजवळ पोहोचल्यावर कोंडा तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, दाराचे कुलूप तसेच असल्याचे दिसले. कपाट, संदूकमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले त्यांना दिसले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर ठाणेदार एफ. सी. मिर्झा सहकाऱ्यांसह दाखल झाले. अब्दुल गफ्फार अन्सारी यांच्या घरातून २९ हजार रुपये रोख रकमेसह ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सहा घड्याळी चोरट्यांनी पळवले.

जिल्ह्यात चाेरट्यांनी गुरुवारी रात्री धुमाकूळ घालत अकाेला येथील तीन ठिकाणी बाळापूर येथे एका ठिकाणी जवळपास साडे तीन लाखांच्या मुद्देमालावर हात साफ केला. त्यामुळे पाेेलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरच नागिरकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत अाहे.

दरम्यान, खदान पाेिलस स्टेशनच्या हद्दीतील बंजारानगरात ठिकाणी घरफोडी ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. साहेबराव लक्ष्मण राठोड यांच्या घरून नेकलेस, मंगळसूत्र, अंगट्या, रोख असा अंदाजे लाखांचा ऐवज लंपास केला. सुभाष देवसिंग राठोड यांच्या घरून हार, मणी, हजार रोख लंपास केले. पप्पू चव्हाण यांच्या घरून हजार राेख चाेरी गेले. सुषमा राठोड खंडू पवार यांच्याकडे चोरीचा प्रयत्न झाला. यानंतर श्वान पथक, फिंगरप्रिन्ट एक्सपर्टला बोलावले.
बातम्या आणखी आहेत...