आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो हेक्टरामधील तुरीवर ढेकूण, किडीचा ‘हल्ला’, शेतकरी हवालदिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - पीक कर्जासाठी झालेली फरपट, यंदा झालेला अत्यल्प पाऊस, रासायनिक खते बियाण्याच्या वाढलेल्या भरमसाठ किंमती, दिवसागणिक वाढत जाणारी महागाई, यासह इतर कारणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता तुरीवरील ढेकूण शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी नवे संकट निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसापासून कीडीला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील तुरीवर या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून महागड्या किटक नाशकाचा वापर करावा लागत आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 
 
कधी नव्हे यंदा मृग नक्षत्रातच पावसाने सुरूवात करून दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली होती. त्यामध्ये जवळपास ७७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रावरील तुरीचा समावेश असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे. 
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातच मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरमसाठ तुरीचे उत्पादन झाल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीची पेरणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वस्वी मदार नगदी पीक असलेल्या तुरीवर होती. परंतु गेल्या काही दिवसापासून कीडीस पोषक असे वातावरण निर्माण झाल्यामुळे तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे. जिल्हयातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील तुरीवर ढेकूण, शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग शेंग माशीने आक्रमण केले आहे. या अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव बुलडाणा, मेहकर चिखली तालुक्यात दिसून येत आहे. सध्या तुरीचे पीक हे फुले कोवळ्या शेंगावर आले आहे. परंतु ही अळी तुरीची फुले कोवळ्या शेंगा फस्त करून पिकाचे नुकसान करीत आहे. त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न तुर उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. या संकटातून वाचविण्यासाठी शेतकरी आर्थिक भुर्दंड सहन करून किटक नाशकाची फवारणी करीत आहेत. 
 
जिल्ह्यात तालुकानिहाय झालेली तुरीची पेरणी 
यंदा जिल्ह्यात ७७ हजार ४०२ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोणार तालुक्यात हजार ८१, खामगाव हजार ८४०, शेगाव हजार ६७३, मलकापूर हजार १६०, मोताळा हजार ५३, नांदुरा हजार ८४१, जळगाव जामोद हजार ९७९, संग्रामपूर हजार ०४, चिखली १२ हजार ३९५, बुलडाणा हजार ३००, देऊळगावराजा हजार १५९, मेहकर १० हजार २९७ सिंदखेडराजा तालुक्यात हजार ६२० हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे. 
 
कीटक नाशकाची फवारणी करावी 
तुरीवर पडलेल्याशेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्युनॉल फाॅक्सर विस मिलिलिटर दहा लिटर पाण्यात मिसळावे. त्याच्यासोबत त्याच फवारणी पंपात १२-६१-० विस मिलीलीटरचे मिश्रण करून त्याची फवारणी करावी. तसेच प्रती हेक्टरी दहा कामगंध सापळे लावून पक्षी थांबे उभारण्यात यावेत. 
- डॉ.चंद्रकांत जायभाये, कृषी तज्ञ 
 
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त येत आहे 
- यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन, मूग उडीद पिकाचे नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तर आता विविध अळ्यांनी तुरीवर आक्रमण केले आहे. या अळ्याचा नायनाट करण्यासाठी महागडी औषधी घेवून त्याची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त येत आहे. 
- विजय पाटील, शेतकरी 
 
औषधीच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ 
तुरीवर पडलेल्या अळीचा नायनाट करण्यासाठी अनेक शेतकरी उसनवारी अथवा कर्ज काढून महागडे किटक नाशक खरेदी करीत आहेत. परंतु हिच संधी साधून कंपन्यांनी कीटकनाशकांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. बाराशे रुपयात मिळणाऱ्या एक लिटर किटक नाशकासाठी शेतकऱ्यांना दिड हजार रुपये मोजावे लागत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...