आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवस सलग तरीही गतवर्षीपेक्षा निम्माच पाऊस, सरासरी अजून दूरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गेले तीन दिवस विदर्भासह अकोला जिल्ह्यात सलग पाऊस पडला असला तरी जिल्ह्यात अजूनही गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पर्जन्यमान नोंदले गेले. यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य काही प्रमाणात कमी झाले तरी शेतीपिकाची समस्या मात्र कायमच राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

महसूल विभागातील नोंदीनुसार जिल्ह्यात गतवर्षी २१ ऑगस्टपर्यंत ६५६.३ मिलीमीटर पाऊस पडला होता. यावर्षी मात्र तो ३४७.३ मिलीमीटरवरच थांबला आहे. पावसाची ही आकडेवारी सरासरीपेक्षाही खूप कमी आहे. गेल्या दहा वर्षांतील आकडेवारी लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत ४९०.३ मिलीमीटर पावसाची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे तो आकडाही गाठता आला नाही. परिणामी पावसाच्या कमतरतेबद्दल प्रशासनानेही चिंता व्यक्त केली असून भविष्यातील दुष्काळसदृश्य स्थिती लक्षात घेता उपाययोजनांची आखणी सुरु केली आहे. 

वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. परंतु हा पाऊस तुरळक आहे. बार्शिटाकळी आणि तेल्हाऱ्याचा शनिवारचा अपवाद वगळला तर गेल्या तीन दिवसांत सर्व सातही तालुक्यात पर्जन्यमानाची नोंद झाली. परंतु ही नोंद गतवर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत निम्म्यावरच अडकली आहे. 

अकोट तालुका तर फारच माघारला आहे. येथे गतवर्षीच्या २१ ऑगस्टपर्यंत ५६०.५ मिलीमीटर पाऊस पडला होता. यावर्षी तो सर्वात कमी म्हणजे १६८.६ मिलीमीटरच नोंदविण्यात आला आहे. याऊलट बाळापूर तालुक्याचे चित्र आशाजनक असून तेथे ४८१ मिलीमीटरच्या (गतवर्षीचा आकडा) तुलनेत ३९६.८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कमी पर्जन्यमानामुळे शेतीपिके अडचणीत आली असून ती वाचविणे शक्यतेच्या पलिकडचे काम झाले आहे. दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून तुरळक का होईना परंतु सलग पडत असलेल्या पावसामुळे नदी-नाले धरणांची स्थिती थोडीफार वधारली अाहे. 

बैलाच्या शिंगोटीवर पडले अाज शितोडे 
सोमवारी सर्वत्र बैलपोळ्याचा सण साजरा केला गेला. या दिवशी वृषभदेवाची म्हणजेच बैलाची पूजा केली जाते. धो-धो जरी नव्हे तरी किमान बैलाच्या शिगोटीवर तरी हमखास पाऊस पडतो, अशी एक आख्यायिका आहे. दरम्यान दिवसभर सुरु असलेल्या अनियमित पावसासह निसर्गाने ही आख्यायिका खरी ठरवली आहे. 
बातम्या आणखी आहेत...