आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पातूर येथील महामार्गावर आढळले तीन मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर- येथून जवळच असलेल्या देऊळगावजवळ तीन युवकांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

देऊळगाव येथून भरधाव येत असलेल्या एमएच ३०, अेजे ७९९७ क्रमांकाच्या दुचाकी गाडीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला जोरात धडक दिली. या अपघातात तीनही वाहनस्वार रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेले. त्यांना वेळीच कोणतीच मदत मिळाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते दिवसांपासून त्याच ठिकाणी पडून राहिलेल्या या मृतदेहांना दुर्गंधी सुटली असता घटनास्थळावर पोलिस पोहोचले. त्या वेळी तीन युवकांचे मृतदेह पडलेले दिसून आले. घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे उपविभागीय अधिकारी विक्रांत देशमुख, जिल्हा अप्पर उपअधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, ठाणेदार अनिल जुंबळे, पातूरचे नगराध्यक्ष हिदायत खान यांनी घटनास्थळ गाठले.
मृतदेहाची ओळख पटली : अपघातातील तीनही मृतदेहांची ओळख पटली आहे. यामध्ये सचिन वसंता चव्हाण रा. देऊळगाव, नारायण श्रीराम उमाळे रा. पातूर, आकाश विश्वास सरदार रा. चान्नी यांचा समावेश आहे.