आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील आठवड्यात मनपाच्या तीन सभा, दोन महासभा होणार, तर एक स्थायीचीही सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पुढील आठवड्यात महापालिकेच्या एकूण तीन सभा होत आहेत. यात दोन महासभांचा समावेश असून, एक सभा स्थायी समितीची होत आहे. सोमवार, बुधवारी महासभा, तर गुरुवारी स्थायी समितीची सभा होत आहे. एकाच आठवड्यात सलग तीन सभा रविवार, चौथा शनिवार महावीर जयंती अशा तीन सुट्या आल्याने महापालिकेचे कामकाज खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोमवारी स्थायी समितीने बदलासह मंजूर केलेल्या २०१५-२०१६ च्या अंदाजपत्रकावर चर्चा करून मंजुरी दिली जाणार आहे, तर २० एप्रिलला होणाऱ्या महासभेत एकूण दहा विषयांवर चर्चा केली जाणार आहे. गुरुवारी स्थायी समितीची सभा घेतली जाणार असून, या सभेतही विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. अंदाजपत्रक महत्त्वाचा विषय असल्याने एकाच सभेत १० विषयांवर चर्चा केली जाणार असल्याने या दोन्ही सभा पाच ते सहा तास चालण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेचा अंजेडा अद्याप प्रसिद्ध झाला नसल्याने या सभेत नेमक्या किती विषयांवर चर्चा होईल, ही बाब स्पष्ट झाली नाही. परंतु, ही सभाही तीन ते चार तास चालण्याची शक्यता आहे. सात दिवसांच्या आठवड्यात तीन सुट्या तीन दिवस सभा असल्याने या आठवड्यात महापालिकेचे कामकाज मंदावण्याची शक्यता आहे. कारण सुट्यांच्या दिवशी महापालिका कार्यालय बंद राहील, तर सभेत सर्वच विभागप्रमुखांना उपस्थित राहावे लागणार असल्याने कामकाजावर परिणाम होऊ शकतो.