आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर "त्या' नवजात जीवाला मिळू शकले असते दीर्घायुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - मुलगा असाे वा मुलगी प्रत्येकालाच जन्म घेऊन जगण्याचा अधिकार अाहे. काेण्या एका कैदाशिणीनं गाेंडस बाळाला जन्म तर दिला. मात्र, संगाेपन नकाे म्हणून चक्क नवजात बालकाला गावठाणाच्या उकिरड्यावर फेकून दिलं. या नवजात बालकाच्या पायाची बाेटे अन् डाेके हिंस्त्र प्राण्यांनी खाल्ले. जर त्या काळीज नसलेल्या मायनं त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवलं असतं, तर त्या एका दिवसाच्या जीवाला दीर्घायुष्य मिळालं असतं. मात्र, झालं भलतच. मिनमिनते डाेळे उघडू पाहणाऱ्या त्या जीवाचे डाेळे कायमचेच बंद झाले.

येथून जवळच असलेल्या गोंधळवाडीत बुधवारी रात्री अनैतिक संबंधातून जन्माला अालेल्या नवजात बालकाला गावठाणाच्या उकिरड्यावर टाकून माय पसार झाली. गुरुवारी सकाळी वाजता एक दिवसाच्या नवजात बालकाचा मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली. या नवजात बालकाच्या पायाची बाेटे अन् डाेके हिंस्त्र प्राण्यांनी खाल्ल्याचे निदर्शनास अाले. आज सकाळी गावातील काही महिला गावठाण येथे शेण फेकण्यासाठी गेल्या असता त्यांना तेथे त्या ठिकाणी एक दिवसाच्या नवजात बालकाचा मृतदेह दिसून आला. हिंस्त्र पशूंनी या नवजात बालकाचे डोके डाव्या पायाची बोटे खाल्ली आहे. जर त्या निर्दयी मायनं मुलाला मंदिर किंवा वस्ती असलेल्या ठिकाणावर साेडले असते, तर ताे जीव वाचला असता. या घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. पोलिस पाटील वामन भोकरे यांनी या घटनेसंदर्भात पातूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार अनिल जुंबळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विद्या लांडे, एएसआय गजानन खिरडकर, खंडारे यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस पाटील भाकरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादंवि कलम ३१८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक संबंधातून जन्मले बाळ?
गाेंधळवाडी येथील गावठाणावर आढळलेल्या नवजात बालकाच्या मृतदेहाविषयी गावात उलटसुलट चर्चेला ऊत आला असून, हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा असावा, अशीही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.