आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतबाह्य झालेले अॉटो हाेणार ‘स्क्रॅप’, ऑटोचालकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फिरत्या पथकाने राबवलेल्या मोहिमेदरम्यान रस्त्यांवर नियमबाह्य फिरणाऱ्या ऑटोंवर कारवाई करण्यात येणार आहे. कालबाह्य झालेल्या ऑटोंवर जेसीबी चालवून समूळ नष्ट करण्याचे आदेश खुद्द परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना नुकतेच दिले आहेत, अशा पद्धतींच्या कारवाईमुळे अामच्यावर बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळेल, असे गाऱ्हाणे ऑटोचालकांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेऊन मांडले.

परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑक्टोबर रोजी नूतनीकरण झालेल्या रद्द झालेल्या ऑटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरणाबाबत बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. ऑटोरिक्षा नूतनीकरणासाठी मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या बैठकीत समोर दिसून आला. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यात खासगी ऑटोरिक्षांमधून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्यामुळे परवानाधारक आॅटोरिक्षांना व्यवसाय मिळत नाही. त्यामुळे मोहीम राबवून सध्याच्या ऑटोरिक्षांवरील थकित कर वसूल करण्यात यावा, असे ठरले. त्यानुसार १६ नोव्हेंबरपर्यंत जे परवानाधारक परवाने नूतनीकरण करणार नाहीत त्यांचे परवाना कायमचे रद्द करण्यात येतील. १६ नोव्हंेबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान मोहीम राबवली.

आताहोणार कारवाई : परवानेनूतनीकरण करता वापरल्या जाणाऱ्या, तसेच परवान्याशिवाय अवैधपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ऑटाेरिक्षांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी अशा आॅटोरिक्षांची नोंदणी माेटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कायमची रद्द करण्यात येणार आहे. त्या ऑटोरिक्षा तांत्रिकदृष्ट्या पुनर्वापरासाठी अपात्र करण्यासाठी हायड्रोलिक प्रेस किंवा जेसीबी चालवण्यात येणार आहे.

वसूल केला दंड
{निकाली प्रकरणे-२१
{दंड वसुली-९५,३००
{कर वसुली-४३,६४८
{एकूण वसुली-१,३८,९४८

मोहिमेंतर्गत कारवाई
{तपासलेली वाहने-४८७
{परवाना संपलेले अॉटो - ६४
{खासगी ऑटोरिक्षा-११२
{इतर वाहने - १७
{एकूण - १९३
{जप्त- १५८

असे होते आदेश
1 ज्या ऑटोरिक्षा परवानाधारकांचे परवाने मुदतबाह्य झाले आहेत, अशा परवानाधारकांना नव्याने परवाने प्राप्त करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या लॉटरी ड्राॅमध्ये अपात्र ठरवण्यात यावे.
2 परवानेनूतनीकरण करता वापरल्या जाणाऱ्या तसेच परवान्याशिवाय अवैधपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ऑटाेरिक्षाचालकांकडून दंड वसूल करून कारवाई करण्यात आली.

तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार
^जिल्हाधिकारीजी. श्रीकांत यांच्याकडे अाॅटाेचालकांनी अापले गाऱ्हाणे मांडले. माझीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली अाहे. वरिष्ठ पातळीवर बाेलून याप्रकरणी ताेडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.'' आर.बी. वाढोकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.