आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराेघरी अाज ‘लक्ष्मी’ची पूजा, लक्ष्मीपूजनासाठी करण्यात अाली खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अश्विनदर्श अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन. रविवार, ३० ऑक्टोबर दिवाळीचा मुख्य दिवस. लक्ष लक्ष दिपांच्या माळा सर्वदूर उजळलेल्या असतील. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी होईल. वसूबारस, धनतेरस आणि नरक चतुर्दशी झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाची सर्वदूर तयारी झालेली आहे. शनिवारी बाजारामध्ये खरेदीदारांची खूप गर्दी झाली होती.
शहरातील गांधी चौक, खुलेनाट्यगृह ते पंजाब काश्मीर लॉज, टिळक रोड, जुना कापड बाजार, नवीन कापड बाजार तसेच शहरातील मोठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनासाठी झेंडुची फुले, केळीचे खांब, आंब्याची पाने, बत्तासे, लाह्यांची दुकाने लागलेली आहेत. सीताफळ, केळी, सफरचंद आदीच्या खरेदीसाठी बाजारामध्ये गर्दी दिसली. दसऱ्याच्या वेळी झेंडुच्या फुलांचे भाव पडले होते. १५ रुपये २० रुपये किलोने फुले विकली गेली. परंतु दिवाळीमध्ये विक्रेत्यांना चांगला भाव मिळालेला दिसला. बाजारामध्ये ३०-४० रुपये किलो दराने झेंडुची फुले मिळत होती.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निवासस्थाने, व्यापारी प्रतिष्ठानांवर रोषणाई करण्यात येते. फुलांच्या माळा, केळीचे खांब संस्कृतीचे दर्शन करत असते. यंदा फटाक्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचा परिणाम फटाका व्यवसायावर झालेला दिसत आहे. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत चिनी बनावटीचे फटाके यंदा कमी प्रमाणात बाजारात आलेले आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांची उत्पादने दुकानात दिसत होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील पूजा अर्चा आटोपली की इष्टदेवतेचे दर्शन घेतात.
लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५.१५ ते १० पर्यंत शुभमुहुर्त
^लक्ष्मीपूजनासाठी प्रदोषकाळीसायंकाळी ५.१५ ते रात्री १० वाजेपर्यंत शुभमुहुर्त आहे. रात्री ते ९.३० वा. अमृतवेळ आहे. या काळामध्ये लक्ष्मीपूजन केले असता सुखशांती नांदून भरभराट होते. लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य राहावा, चांगल्या मार्गाने लक्ष्मीचा वरदहस्त राहावा, अशी प्रार्थना करावी. तसेच लक्ष्मीसमोर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे, त्यामुळे जागेत शुद्धता राहते. घरात लक्ष्मीचा वास राहतो. मंगेश शास्त्री, नाथ शक्तीपीठ, अकोला.
बातम्या आणखी आहेत...