आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी सोमवार, २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ९०० ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी उदय राजपूत यांनी सांगितले.
देशात नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावल्यास सक्षम लोकशाहीची निर्मिती होऊ शकते. या उद्देशाने भारत निवडणूक आयोगामार्फत मतदानाचे हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे ही बाब नागरिकांच्या पचनी पडावी या हेतूने हा दिन साजरा केला जातो. मी एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडतो, असे म्हणणारे अनेक जण असतात. एका मताने एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने बजावलेल्या मतदानामुळेच लोकशाही सक्षम करण्यासाठी मोलाची मदत होते, असे राजपूत म्हणाले.

तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. विविध महाविद्यालयांत युवक-युवतींसाठी मतदानाची गरज कशासाठी? या विषयावर प्रबोधनपर व्याख्याने, निबंध स्पर्धा, शाहिरांच्या पोवाड्यातून जनजागरण आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

विशेषत: वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. युवा मतदारांना मतदानासाठी प्रभावित करण्यासाठी इंटरनेटचा योग्य वापर केला जाईल. मतदारांनी भविष्यात निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास मतदानाच्या स्वरूपात पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दुबारमतदार नोंदणी मोहीम : ज्यामतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत, अशांचा शोध घेण्यात येणार आहे. मतदार यादीत आपले नाव नोंदवण्यासाठी जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

सोशल मीडियाचा वापर करून जनजागृतीवर राहील भर
^मतदानाविषयी जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत फेसबुक व्हॉटसअॅपच्या माध्यमातून मतदानाविषयीची प्रभावी जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' युवराजपाटील, जिल्हामाहिती अधिकारी, अकोला