आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती निघणार आज अापल्या गावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - गत दहा दिवसांपासून ज्याच्या अागमनाने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला हाेता, वातावरण प्रफुल्लीत झाले हाेते, त्या गणरायाला गुरुवारी निराेप देण्यात येणार अाहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी गणेशोत्सव मंडळ प्रशासन सज्ज झाले अहे. मिरवणुकीला जयहिंद चाैकापासून प्रारंभ हाेणार अहे.

सप्टेंबर राेजी चतुर्थीला गणरायाची भक्तिभावाने स्थापना करण्यात अाली. शहरात लालबागचा राजा, मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ, सिंधी कँपमधील श्री बालक गणेशोत्सव मंडळ, अर्जून समाज गणेशोत्सव मंडळ, कल्याण गणेशोत्सव मंडळाच्या आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली हाेती. सालाबादप्रमाणे यंदाही दरवर्षी नत्रेदीपक देखावे साकारण्यात अाले हाेते. अनेक मंडळांनी सामाजिक प्रश्नांना वाचा फाेडणारे देखावे साकारले हाेते. जिल्ह्यात जवळपास हजार ८०० मंडळांनी नाेंदणी केली हाेती. दरम्यान, गुरुवारी विसर्जन मिरवणुकीला जयहिंदपासून प्रारंभ हाेणार अहे. मानाच्या पहिल्या बाराभाई गणपतीच्या पूजनानंतर मिरवणुकीला प्रारंभ हाेणार अहे. मिरवणूक वीर हनुमान चाैक, जनता बँक, टिळक राेड, अब्दुल हमिद चाैक (अकाेट स्टँड), सुभाष चाैक, ताजनापेठ, गांधी चाैक, महाराणा प्रताप चाैक गणेशघाट या मार्गाने काढण्यात येणार अाहे.

स्वयंसेवीसंघटनांकडून चहा, महाप्रसादाची व्यवस्था : विसर्जनमिरवणुकीच्या किलाे मीटरच्या मार्गावर स्वयंसेवी संस्थांकडून गणेशभक्तांकडून चहा, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार अाहे. काही समाज मंडळ, व्यक्तिगत स्तरावरावरीही गणेशभक्तांसाठी िपण्याचे पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात येणार अाहे.

येथे येणार निर्माल्य रथ
शहराच्याज्योतीनगर, सिद्धी विनायक मंदिर चौक, आशिर्वाद अपार्टमेन्ट चौक, शंकरनगर, बाजीराव पेशवे मार्ग गड्डम प्लॉट, लोकमान्य टिळक मार्ग प्रसाद कॉलनी, उत्तरा कॉलनी, मुकुंद मंदिर परिसर, रामदास पेठ, गुप्ते रोड, स्व. अरुण दिवेकर मार्ग, एसबीआय या भागातून निर्माल्य रथ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या दरम्यान फिरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...