आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्‍यामध्‍ये आज ग्रा.पं साठी होणार मतदान, 253 सरपंचांची होणार निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ५३० पैकी २७२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने जिल्ह्याच्या निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रात शनिवारी ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यात लाख ८९ हजार ६४ नागरिक मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणार असून, विविध ग्रामपंचायतींसाठी त्यांना १३४१ सदस्यांची निवड करावयाची आहे. 
 
जिल्हाभरात हजार ८०३ उमेदवार मैदानात आहेत. तर २५३ सरपंचांसाठी (बिनविरोध १७ आणि अर्जच भरलेल्या दोन ग्रापंच वगळून) ८९७ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवडणूक थेट होत आहे. सोमवारी ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक ५५ ग्रामपंचायती अकोला तालुक्यातील आहेत. ५१ ग्रामपंचायती मूर्तिजापूर तालुक्यातील असून, बार्शीटाकळी तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. अकोटमध्ये ३७, पातूरमध्ये २८, बाळापुरात २७ तर तेल्हाऱ्यात २४ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे. 
 
१९ सरपंच, ७७७ सदस्यांसाठी निवडणूक नाही 
उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार दरम्यान १७ सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय अकोल्यातील दोन गावांसाठी अर्जच भरले गेले नाहीत. त्यामुळे २७२ पैकी १९ ठिकाणी सरपंचासाठीचे मतदान होणार नाही. त्याचप्रमाणे २११८ पैकी ७७७ ठिकाणचे सदस्य बिनविरोध विजयी झाल्याने त्या जागांसाठीही मतदान घेतले जाणार नाही. परंतु त्याच वाॅर्डातील इतर सदस्यांच्या निवडीसाठी मात्र निवडणूक घेतली जाईल. 
 
बातम्या आणखी आहेत...