आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अॅट्रॉसिटी’त सुधारणेसाठी अाज मराठा क्रांती मूक माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - काेपर्डी येथील बलात्कार हत्याकांडाचा निषेध करणे, अॅट्राेसिटी कायद्यात बदल सुधारणा करा, मराठा समाजाला तत्काळ अारक्षण लागू करा, या मागण्यासाठी १९ सप्टेंबर राेजी मराठा क्रांती मूक माेर्चा काढण्यात येणार अाहे.
मराठा क्रांती माेर्चा काेणत्याही जाती विराेधात नसून व्यवस्थेच्याविराेधात अाहे. माेर्चा सकाळी ११ वाजता अकाेला क्रिकेट क्लब येथून निघणार अाहे. या मुक माेर्चामध्ये घाेषणा अथवा नारेबाजी करण्यात येणार नाही. माेर्चात सहभागी हाेणाऱ्या मराठा समाज बांधव- भगिनींच्या हातात विविध घाेषणा असलेले फलक, भगवे काळे झेंडे राहणार अाहेत. माेर्चात सर्वांत पुढे मुली त्यानंतर महिला, वृद्ध, युवक त्यानंतर पदाधिकारी, नेते राहणार अाहेत.

माेर्चासाठीजय्यत तयारी : अकाेलाक्रिकेट क्लब ते जिल्हाधिकारी कार्यलयादरम्यान काढण्यात अालेल्या माेर्चाच्या मार्गावर सीसीटिव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकर, वाॅकिटाॅकी, रुग्णवाहिका, अग्निशमन दल सज्ज राहणार अाहे. माेर्चात हजार पुरुष अाणि ५०० महिला स्वयंसेवक राहणार अाहेत. माेर्चाच्या मार्गावर लाऊडस्पीकर लावले अाहेत.

स्टेजतयार : माेर्चासाठीएकूण २५ समित्या गठित केल्या अाहेत. या समित्यांना त्यांची जबाबदारी सांगण्यात अाली असून, समित्यांचे काम पूर्ण झाले अाहे. माेर्चासाठी लाख पाणी पाऊचची व्यवस्था केली अाहे. माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पाेहाेचल्यानंतर मुली निवेदन वाचून दाखवणार अाहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर छाेटेखानी स्टेज तयार केले अाहे. त्याच मुली अाणि त्यांच्यासाेबत माेजके पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार अाहेत.

मोर्च्याला सर्व समाजाने पाठिंबा द्यावा : डॉ.अभय पाटील : मराठाक्रांती मोर्चास समस्त समाजाचा नागरिकांनी संपूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करावे असे अावाहन डॉ. अभय पाटील यांनी रविवारी केले. त्यांनी जुना भाजी बाजार परिसरातील आदिनाथ जैन मंदिरास स्वाध्वी प.पु.प्रीतीधर्माश्रीजी म.सा.यांचा आशीर्वाद प्राप्त केला. यावेळी त्यांनी चर्चेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या एकंदर सामाजिक परिस्थितीची जाणीव करून दिली. पुरोगामी राज्य घडवीत असतांना समाजावर होणारे अन्याय,अत्याचार थांबले पाहिजेत, यासाठी लढा उभारल्या जात अाहे. या लढ्यात सर्वांनी सहकार्य करावे असे अावाहन त्यांनी केले. डॉ. पाटलांचा परिचय आदिनाथ पेढीचे अध्यक्ष मयूरभाई शाह यांनी दिला. याप्रसंगी एस.व्ही .वर्धमान भवन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशभाई शाह यांनी डॉ. पाटील यांचा शाल ,श्रीफळाने सत्कार केला . यावेळी जैन समाज बांधव-भगिनी उपस्थित हाेत्या.

शाळांना सुटी
गर्दीलक्षात घेता साेमवारी शाळांबाबत शिक्षणाधिकाऱी, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या मुख्याध्याकांना रविवारी पत्राद्वारे सूचना दिल्या. शहरातील सर्व माध्यमाच्या, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यपकांनी १९ सप्टेबरला सर्व शाळांनी बदली सुटी घेण्याचा निर्णय घ्यावा, असे पत्रात नमूद केले अाहे.

तगडा बंदाेबस्त
तगडा पाेलिस बंदाेबस्त ताैनात करण्यात येणार अाहे. चेकिंग पाॅईंटचे नियाेजन करण्यात अाले अाहे. राज्यराखीव शिघ्र कृती दलाचे जवानही कार्यरत राहणार अाहेत. माेर्चासाठी उपविभागीय पाेलिस अधिकारी ०४, पाेलिस निरीक्षक २०, उपनिरीक्षक ३०, पाेलिस कर्मचारी ६०० असणार अाहे.

शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
१. मध्यवर्तीबस स्थाकडून अकाेटकडे जाणारी वाहतूक मुख्य डाकघर, सिव्हील लाईन्स चाैक, रतनलाल प्लाॅट चाैक, स्टेशनचाैक, अापातापा चाैक अशी वळवण्यात येणार अाहे.
२.पातूर,बाळापूरकडे जाणारी वाहतूक खासगी बस स्टॅंड, हुतात्मा चाैक, नेहरु पार्क चाैक, सिव्हील लाईन्स चाैक, मुख्य डाक घर अशी वळवली अाहे.
३.शहरातीलदुचाकी, तीन चाकी चार चाकी वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात अाले अाहे. डाबकी राेड, जुने शहर, भांडपुरा चाैक- किल्ला चाैक-जयहिंद चाैक-दगडीपुल यामार्गाने अकाेटकडे जाता येईल. तसेच डाबकी राेड-भांडापुरा चाैक-हरिहर पेठ-वाशिम बायपास चाैक यामार्गाने जाता येईल.
४.बसस्थानक-गांधी चाैक-महाराणा प्रताप चाैक-जयहिंद चाैक--पाेळा चाैक-हरिहर पेठकडे जाणारी वाहतूक सकाळी ते दुपारपर्यंत बंद राहील.
बातम्या आणखी आहेत...