आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार बनण्यासाठी आज शेवटची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानसभा,महापािलका जिल्ह्यातील नगरपािलकांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीत नाव नोंदविण्याची शेवटची संधी उद्या, शुक्रवारवर येऊन ठेपली आहे.
जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेली सध्याची मतदार यादी १६ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाली अाहे. त्याच दिवसापासून यावर्षीच्या मतदार पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरु झाला असून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये मतदारांची नोंदणी केली जात आहे. त्यासाठी गेल्या दोन रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष मोहीमही राबवण्यात आली.

मतदार यादीसाठीची नोंदणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी केली जात आहे. परंतु हीच यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठीही वापरली जाणार आहे. त्यामुळे एक जानेवारी २०१७ रोजी किंवा तत्पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण-तरूणींनी मतदार म्हणून नावे नोंदवून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चुकीची दुरुस्तीही सुरु :नवी नावे नोंदविण्याबरोबरच मतदार यादीतील मतदारांच्या नावात दुरूस्ती असल्यास ते कामही या निमित्ताने करता येणार आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत, दुबार अथवा मयत व्यक्तींची नावे वगळण्याचीही संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही निवडणूक यंत्रणेने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...