अकोला - शून्य ते ३० वयोगटातील व्यक्तींनी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. प्राधान्याने विवाह योग्य गटातील स्त्री-पुरुषाने आवर्जून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले आहे.
१९ जून हा दिवस जागतिक सिकलसेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त सिकलसेल आजाराविषयी त्यांनी माहिती दिली. सन २०११-२०१२ पासून अकोला जिल्ह्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत असून, लाख ८१ हजार ८६० सोल्युबिलिटी तपासणीमध्ये पीडित रुग्ण १४८ वाहक हजार ६०७ असे आढळून आले आहेत. वाहक व्यक्ती हा सामान्यांचे जीवन जगतो. त्याला पीडित रुग्णासारखा कोणताही त्रास होत नाही. मात्र, हा रोगी सिकलसेल आजार समाजात पसरवण्याचे कार्य करतो. आरोग्य विभागामार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामीण रुग्णालयात सिकलसेलचे निदान मोफत केले जाते. जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतात, अशी माहिती जिल्हा समन्वयक किशोर फाळके यांनी दिली.
असा मिळतो फायदा : सिकलसेलरुग्णास पीडित दहावी बारावीच्या परीक्षेस प्रती तास २० मिनिटे अधिक वेळ देण्यात येतो. तसेच रुग्णास बसमध्ये मोफत प्रवास देण्याचे प्रस्तावित आहे.
हा आजार कोणाला होऊ शकताे : सिकलसेलआजार अानुवंशिक असतो. भिल आदिवासी किंवा वंचित घटकामध्ये सर्वसाधारणपणे हा आजार आढळून येतो. छोटे जनसमुदाय किंवा त्या समुदायामध्ये नात्यात विवाह होतात. त्यांच्यात सिकलसेलचे प्रमाण जास्त आढळते. महाराष्ट्रात सातपुड्याचा पट्टा, गडचिरोली, विदर्भ आदी भागात या आजाराचे प्रमाण जास्त आहे.
ही आहेत लक्षणे
दृष्टिक्षेपात उपचार : सिकलसेलआजारावर काेणतेही थेट उपाय नाही. रुग्णात जशी लक्षणे दिसतात, त्यानुसार उपाययोजना केली जाते. आजारावर संशोधन सुरू आहे.
{ रक्तपेशी एकमेकात अडकतात.
{ रुग्णाची प्रतिकारक शक्ती कमी होते.
{ रुग्णांना दम लागतो, कावीळ होतो.