आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक यंत्रणा सज्ज, अाज मतदान, उद्या होणार मतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - अकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबरला होत असून, या निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गीता ठाकरे, सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्या संनियंत्रणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा कार्यरत झाली आहे.
निवडणुकीत अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी १० उमेदवार रिंगणात आहेत, तर प्रभाग क्र. ते १५ करिता प्रत्येकी दोन प्रभाग क्र. १६ करिता तीन अशा एकूण ३३ सदस्यपदाच्या जागेसाठी १५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले भाग्य अाजमावत आहेत.

निवडणुकीत प्रभाग निहाय ९५ मतदान केंद्र असून, प्रत्येक मतदान केंद्राकरिता मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी,एक महिला कर्मचारी, एक शिपाई एक पोलिस कर्मचारी या प्रमाणे ९५ मतदान केंद्रासाठी ५७० प्रशिक्षित कर्मचारी १६ राखीव पथक मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय, निःपक्ष शांततेत पार पाडण्यासाठी तैनात केली आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पाच क्षेत्रिय अधिकारी नियुक्त केले आहेत.

९५ मतदान केंद्रासाठी सीलबंद मतदान यंत्रे (९५ कंट्रोल युनिट २१० बॅलेट युनिट) संवैधानिक असंवैधानिक निवडणूक साहित्य मतदान केंद्रासाठी पुरवले आहे. निवडणुकीसाठी १२ वाहने अधिग्रहीत केली आहेत. त्यासाठी वाहतूक आराखडा निश्चित केला आहे.
अतिरिक्तपोलिस बंदोबस्त राहणार : शहरातीलसंवेदनशील गर्दीच्या मतदानकेंद्रा करिता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राहणार आहे. शहरातील कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शनिवारला मतदान यंत्रे निवडणूक साहित्य मतदान पथकांना कार्यालयातून वितरित केले आहे. रविवार २७ ला स. ७.३० ते सायं ५.३० पर्यंत मतदान आहे. प्रारंभी उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्राने अनुरूप मतदान ( Mock poll) घेऊन मतदान यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री केली जाईल. तद््नंतर मतदान यंत्रे विहित पद्धतीने सीलबंद करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. मतदान आटोपताच मतदान यंत्रे संवैधानिक असंवैधानिक निवडणूक साहित्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कास्तकार सभागृहात जमा केले जाईल. मतमोजणीपर्यंत तेथील स्ट्राँगरुमला मतदान यंत्रे ठेवून रुम सीलबंद करण्यात येईल.

निवडणूक मतमोजणीला सोमवार, २८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. मतमोजणीकरिता आठ टेबलवर प्रथम प्रभाग क्र. ते ची मतमोजणी होईल. एका टेबलवर एका प्रभागाची मतमोजणी केली जाईल. तद्नंतर प्रभाग क्र. ते १६ ची मतमोजणी करण्यात येईल. याकरिता मतमोजणी पर्यवेक्षक प्रगणक शिपाई तसेच रो आॅफिसर यांना प्रशिक्षण दिले आहे. मतमोजणीसाठी संगणक डाटा आॅपरेटर, स्ट्राँगरुम व्यवस्था, सिलिंग स्टाफ, माध्यम कक्ष ,अशाप्रकारे मतमोजणीसाठी सुक्ष्म नियोजन केले आहे. उमेदवार त्यांचे प्रतिनिधी कर्मचारी इत्यादींना प्रवेशार्थ पासेस देण्यात येतील. मतमोजणी परिसर सिल करण्यात येत असून, मोठा पोलिस बंदोबस्त राहणार आहे, अशी माहिती निवडणूक माध्यम कक्षाकडून दिली आहे.
मतमोजणीसाठीही राहील तगडा पोलिस बंदोबस्त

संपूर्ण मतदान पथके केंद्रावर पोहोचले
शहरातील प्रभाग क्र. ते १६ मधील ७१,७३५ मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. मतदारांना मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्र इ. माहिती असलेल्या वोटर स्लिप घरोघरी जाऊन वितरित केल्या आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाद्वारे True voter अॅप विकसित केले. मतदारांना घरीबसूनच आपले स्मार्ट फोनद्वारा मतदार यादीतील अनुक्रमांक मतदार केंद्र क्रमांक शोधण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. निवडणूक कर्मचारी मतदान टपाल मतपत्रिकेद्वारा आपला मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. निवडणुकीत आचारसंहितेचे पालन व्हावे, याकरिता चार पथके दोन भरारी पथके लक्ष ठेवणार आहेत. तसेच मतदान केंद्रात कुठलाही व्यत्यय निर्माण झाल्यास तत्काळ मदत चमू (क्विक रिस्पाँन्स टिम) तयार केली आहे.
बातम्या आणखी आहेत...