आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी स्थायी समितीची अाज सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषदेच्या स्थायी समितीची सभा साेमवार, १० अाॅक्टाेबर राेजी हाेणार अाहे. सभेतसीसी कॅमॅरेचा मुद्या गाजण्याची शक्यता अाहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा गाजला हाेता. सूचना दिल्यानंतरही अधिकारी सभेत हजर राहत नसल्याने अाम्ही सभेत का यावे, असा प्रश्न उपस्थित केला हाेता. या मुद्यावरुन सदस्य अाक्रमक झाल्याने अधिकाऱ्यांनी गैरहजर असलेल्या विभागप्रमुखांकडून खुलासा मागवून कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल, असे सांगितले हाेते. दरम्यान, १० अाॅक्टाेबरला स्थायी समितीची सभा अायाेजित करण्यात अाली असली तरी ८,९ अाॅक्टाेबर राेजी कार्यलयाला सुटी हाेती अािण ११ १२ शासकीय सुटी अाहे.

त्यामुळे साेमवारची सुटीचा अर्ज सादर झाल्यास सलग पाच दिवस सुटी उपभाेगता येऊ शकते. त्यामुळे १० अाॅक्टाेबर राेजी हाेणाऱ्या सभेतला किती अधिकारी हजर राहतात, हे सभेच्या दिवशी दिसेलच.
बातम्या आणखी आहेत...