आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अकोल्यानजिक अपघातात बुलडाण्याचे चार वऱ्हाडी ठार, 29 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघात ठार झालेले व-हाडी. - Divya Marathi
अपघात ठार झालेले व-हाडी.
अकोला/धामणगाव बढे - बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील वऱ्हाडी लग्नासाठी अकोल्यात मिनीट्रकने येत असताना राष्ट्रीय महामार्गावर कान्हेरी-व्याळा नजीक अंबुजा फॅक्टरीजवळ समोरून आलेल्या एसटीशी जोरदार धडक झाली. यामध्ये चार वऱ्हाडींचा मृत्यू झाला, तर बस व मिनीट्रकमधील ४० जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे येथे शोककळा पसरली.
धामणगाव बढे येथील हरिभाऊ दगडू काटे यांचा मुलगा राम याचे लग्न आज मंगळवारी अकोला येथील वासुदेव नथ्थूजी मोरे यांची मुलगी अश्विनी हिच्यासोबत ठरले होते. लग्नामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. लग्नासाठी नवरदेवाचे नातेवाईक दोन दिवसांपासूनच त्यांच्या घरी आले होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी रिमझिम पावसात नानमुखाचा कार्यक्रम आटोपून मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास काटे परिवार व नातेवाईक असे एकूण ३१ वऱ्हाडी एमएच ४३ बी ८४६९ या क्रमांकाच्या मिनीट्रकने अकोला येथे लग्न लावण्यासाठी निघाले. खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील मालवा ढाब्याजवळ येताच भरधाव मिनीट्रक व समोरून भरधाव येणाऱ्या एमएच २० बीएल २२१२ क्रमांकाच्या अकोला ते अंबड या बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात एसटीच्या कॅबिनचे दोन भाग झाले. मिनीट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. या अपघातात मिनीट्रकमधे बसलेले अरुण तुकाराम काटे वय ४० वर्षे, प्रभाकर शंकर गवळी वय ४० वर्षे, रवींद्र मोतीराम शहाणे व दीपक अर्जुन लेनेकर हे चार वऱ्हाडी जागीच ठार झाले असून, २७ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिका व इतर वाहनाने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले.
लग्नासाठी वेळेवर आले असते तर...
लग्नाची वेळ सकाळी ११.३० वाजताची होती. मात्र, वऱ्हाडी घरूनच उशिरा निघाले. ते १२ वाजता अकोल्यापासून १२ किमी अंतरावर होते. ते एक तास उशिराने पोहोचणार होते. त्यामुळे त्यांच्या वाहनाचा वेग जास्त होता. त्यामुळे अपघात झाला. कदाचित वेळेवर जर लग्नस्थळी पोहोचले असते तर दुर्घटना टळली असती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अपघाताचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...