आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेेंदणी साडे 3 लाख क्विंटल; खरेदी मात्र दीड लाख क्विंटल, तूर खरेदी थांबली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - बाजार हस्तक्षेप याेजनेअंतर्गत नाफेड केंद्रावर नाेंद झालेल्या 3 लाख ५२ तूरपैकी 1 लाख ४९ हजार तुरीची खरेदी झाली असून, अाकाेट केंद्र वगळता इतर ठिकाणावरील तूर खरेदी बंद करण्यात अाली अाहे. अाकाेट येथील तुरीचा पंचनामा करुन खरेदी करण्यात येणार अाहे. बाजारात पूर्वीच्या तुलनेने वाढलेले भाव अन् लालफितशाहीच्या काराभारामुळे अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तूर विकली. 
 
तुरीचे माेजमाप व्यवस्थित होत नसल्याने शेतकऱ्यांची सुरुवातीपासूनच गैरसाेय झाली हाेती. २२ एप्रिल राेजी नाफेडने तूर खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली हाेती. राज्य सरकारने २२ एप्रिलपर्यंत नाेंद झालेली तूर खरेदी करण्याचा िनर्णय घेतला हाेता. त्यानंतर पुन्हा नाेंद करण्याची मुदत ३१मे पर्यंत वाढवण्यात अाली. मात्र पुन्हा खरेदीची मुदत वाढण्याची मागणी पुढे अाली. अखेर खरेदीची मुदत ३१ अाॅगस्टपर्यंत वाढवण्यात अाली हाेती. 
 
...त्यामुळे फिरवली पाठ : तूरीची नाेंद करणाऱ्या शेतकऱ्यांनी खरेदीसाठी अावश्यक दस्तावेज तुरीसह यावे, असे अावाहन करण्यात अाले हाेते. जवळपास नाेंद केलेल्या नाेंद लाख क्विंटल तूरीची खरेदीच झालेली नाही. काही दिवसांपूर्वी बाजारात तुरीचे भाव प्रती क्विंटल हजार ६०० ते हजार ७०० पर्यंत पाेहाेचले हाेते. हे भाव नाफेडपेक्षा तीनशे ते चारशे रुपये कमी मिळत असले तरी रक्कम लवकर मिळत असल्याने अाणि तुरीची अाद्रताही तपासण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे धाव घेतली हाेती. तसेच अनेक व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या नावाने तुरीची नोंद केल्याचे समजते. 
 
त्यामुळे अनेकांनी नोंद केल्यानंतरही तूर नाफेडच्या केंद्रावर विकण्यासाठी अाणली नाही. नाफेड केंद्रावर तूर खरेदीपूर्वी अार्द्रता यंत्राद्वारे तुरीची अार्द्रता मिटरद्वारे तपासण्यात येत अाहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त अार्द्रता असल्यास त्यानुसार दर कमी करण्यात येणार अाहेत. 
दरम्यान मागील काही दिवसांपासून बाजारात भाव पुर्वीच्या तुलनेत बरे अाहे. त्यामुळे बाजारात पूर्वीच्या तुलनेने वाढलेले भाव अन् लालफितशाहीच्या काराभारामुळे अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात तूर विकली अाहे
बातम्या आणखी आहेत...