आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर मतदारसंघासाठी चुरशीची लढत, भूलथापांना बळी पडू नका : डाॅ. पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- अकोला,अमरावती,यवतमाळ,वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत तीन फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. कधी नव्हे एवढी ही निवडणुक चुरशीची होत आहे. या निवडणुकीत विविध पक्षाचे एकुण १३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र डॉ.रणजित पाटील यांना विविध संघटनांनी पाठींबा जाहिर केला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सहा वर्षा पूर्वी झालेल्या या निवडणुकीत डाॅ. पाटील निवडुन आले. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राज्यात भाजपची सत्ता आली. डॉ.पाटील अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तर झालेच त्या शिवाय त्यांच्याकडे विविध महत्वांच्या खात्यांचा भारही आला. पदवीधर मतदार संघातून ते आले असल्याने कायम विना अनुदानित पात्र घोषित शाळांना २० टक्के अनुदान त्यांनी पाठपुरावा केल्यामुळेच मंजुर झाले. १३ उमेदवार असल्याने ही लढत बहुरंगी दिसत असली तरी विविध संस्थांनी डॉ.रणजित पाटील यांना पाठींबाही जाहिर केला आहे. यात बुलडाणा अर्बन क्रेडीड सोसायटी, बुलडाणा अर्बन चॅरीटेबल सोसायटी, बुलडाणा अर्बन सेफ्टी अॅन्ड सेक्युरिटी, बुलडाणा अर्बन क्रेडीट युनिटचा समावेश आहे. त्यामुळेच ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. 
 
भूलथापांना बळी पडू नका : डाॅ. पाटील  
अकाेला अमरावतीविभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक 3 फेब्रुवारी राेजी हाेत अाहे. प्रत्येक पदवीधराने लाेकशाही मार्गाने मिळालेल्या मतदानाचा हक्क काेणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडता बजवावा, असे अावाहन उमेदवार गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केले अाहे. डाॅ. पाटील यांनी निवडणूकीची तयारी मतदार नाेंदणीची व्यापक माेहिम राबवून केली. विविध संघटनांचा त्यांना पाठींबा मिळाला. काही लाेक खाेटा प्रचार करुन मतदारांना संभ्रमित करत अाहे. तेव्हा मतदारांनी भूलथापांना बळी पडता मतदान करावे, असे अावाहन त्यांनी केले अाहे. 
 
खोडकेंच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा
अकाेला एकाला धमकी देऊन दबाव टाकल्याप्रकरणी पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संजय खोडकेंच्या विरोधात अमरावतीतील गाडगे नगर पोलिस स्टेशनमध्ये गुरूवारी उशिरा रात्री अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मेघश्याम अमृतराव करडे यांच्या तक्रारीवरून ही नोंद केल्याचे गाडगे नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलाश पुंडकर यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...