आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला प्राप्त झाले ७३२ अर्ज; एमअायएमचीही प्रचार समिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी माेर्चे बांधणीला सुरुवात केली असून, उमेदवारीसाठी भाजपला एकूण ७३२ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर एमअायएमने (अाॅल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन ) साेमवारी प्रचार समितीची स्थापना केली.
जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले अाहे. जिल्ह्यात विविध पक्षात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला प्रारंभ केला अाहे. दरम्यान,भाजपने उमेदवारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.
तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर या नगरपरिषदांच्या ११३ सभासद नगराध्यक्ष पदांसाठी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी ७३२ अर्ज प्राप्त झाले असून, यामध्ये डॉक्टर, वकील, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रात उमेदवारांचा समावेश अाहे.
भाजपमध्येप्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली :भाजपकडे सर्वाधिक अकोट, मूर्तिजापूर , तेल्हारा या नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीची मागणी हाेत असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला अाहे. मूर्तिजापूर येथील नगरपालिका उपाध्यक्ष लखन अरोरा यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांसह अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे. दरम्यान, राज्यात अाणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली अाहे. ़
एमअायएमनीने मले पदाधिकारी : जिल्ह्यातनगर परिषदांच्या निवडणुकीसाठी एमअायएमने प्रचार समितीमध्ये नेत्यांची नेमणूक केली अाहे. यामध्ये जमील खान गुलाम रसूल खान, माे. मुस्तफा माे. युसुफ, सय्यद माेहसीन अली सय्यद अख्तर अली, माे. इरफान अब्दुल रहेमान, हिम्मतराव भिमराव जाधव, अब्दुल नसीब अब्दुल रऊफ, बिस्मिल्ला शाह जब्बार शाह, असलम खाँ अफजल खाँ, अब्दुल वाकिफ माे. अारिफ यांचा समावेश अाहे. ही घाेषणा काेअर कमेटीचे प्रदेश सदस्य हाजी माे. सलिम हक यांनी केली.
अाजपासून घेण्यात येणार मुलाखती
नगराध्यक्ष प्रभाग उमेदवारीसाठी मुलाखती भाजप कार्यालयात मंगळवारपासून घेण्यात येणार अाहेत. तेल्हारा, अकोट पातूर नगरपालिकेच्या उमेदवारांच्या मुलाखती हाेणार अाहेत. २६ ऑक्टोबरला मूर्तिजापूर बाळापूर येथील नगरपालिका उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजप कोअर कमिटी घेणार अाहे. या वेळी प्रामुख्याने खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर,आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शीला खेडकर, रामदास तायडे, रवी गावंडे, बाबुराव शेळके, श्रीकृष्ण मोरखडे आदी उमेदवारांची चाचपणी करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...