आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबघाईस आलेल्या खरेदी-विक्री समित्यांच्या निवडणुका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - अर्थव्यवस्था डबघाईस आलेल्या जिल्ह्यातील सात तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या तालुका शेतकी खरेदी-विक्री समित्यांच्या निवडणुकीसाठी १६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. सातही समित्यांच्या एकूण १०३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे या निवडणुका प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत वाढणार आहे. दुसरीकडे मात्र यातील काही समित्यांकडे निवडणुका लढविण्यासाठीचा निधीही उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.

सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांनी या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये बुलडाणा तालुका शेतकी खरेदी-विक्री समिती, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, नांदुरा, जळगाव जामोद, तसेच मलकापूर तालुका शेतकी खरेदी-विक्री समितीचा समावेश आहे. ज्या भागातील शेतपिकांवर या समित्या अवलंबून आहेत, तिथेच सध्या अवर्षणाची परिस्थिती आहे. त्यामुळे समित्यांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. चिखली आणि मलकापूर येथील शेतकी खरेदी-विक्री समित्यांची स्थिती सध्या चांगली आहे. मात्र, इतर पाच तालुक्यांच्या समित्या आता केवळ नावापुरत्याच असल्याचे दिसत आहे.

अनेक मतदारांचा मृत्यू
बुलडाणातालुका शेतकी खरेदी-विक्री समितीची स्थापना दोन जुलै १९६६ रोजी झाली होती. या समितीची जुनी मतदार संख्या दोन २०० एवढी आहे. त्यामध्ये नवीन मतदारांची भर पडली नाही. मतदारांपैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ४०० ते ५०० मतदार आता हयात नसल्याची शक्यता आहे. -नारायण सुसर, अध्यक्ष,तालुका खरेदी-विक्री समिती

असे आहेत मतदारसंघ
सहकारीसंस्था, वैयक्तिक सभासद, अनुसूचित जाती-जमाती, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, भटक्या जाती जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग.

मेहकरमध्ये १५, बुलडाण्यात वर्षांनंतर निवडणूक
बुलडाणाया जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली तालुका शेतकी खरेदी-विक्री समितीची निवडणूक मुदत संपल्यानंतर सात वर्षानंतर होत असल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच मेहकर येथील शेतकी खरेदी-विक्री समितीची निवडणूक तब्बल पंधरा वर्षानंतर होत आहे. उशिरा निवडणुका होणार असल्याने आता राजकीय इच्छाशक्ती जागृत होणार आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे.

मतमोजणी १७ ऑगस्टला
सोमवार,१३ जुलैपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. १७ जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. २० जुलैला अर्जांची छाननी, २१ जुलै नामनिर्देशन प्रसिद्धी, २२ जुलै ते आॅगस्टपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी, आॅगस्ट रोजी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध, १६ ऑगस्टला मतदान आणि १७ ऑगस्टला मतमोजणी.

१३ - जळगाव जा.
१६ - नांदुरा
१५ - दे.राजा
१३ - मलकापूर
१५ - मेहकर
१३ - चिखली
१६ - बुलडाणा