आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपावसात रस्त्यावरचे झाड बाजूला सारले; अपघाताचीही हाेती शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सोमवारी संध्याकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू असताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून जाणाऱ्या मूर्तिजापूर रोडवर बाभळीचे झाड रस्त्यावर पडले. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी तत्परतेने धाव घेत सोमवारी रात्री वाजताच्या सुमारास सुबाभळीचे रस्त्यावरील झाड भरपावसात बाजूला सारून आपल्या कार्यतत्परतेची अनुभूती दिली.

पावसामुळे रस्त्याच्या मधोमध सुबाभळीचे झाड पडल्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. या वेळी एकाच दिशेने वाहतूक सुरू होती. रस्त्यावर झाड पडल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार यांना मिळाली. त्यांनी लगेच त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. मात्र, पोलिसांजवळ झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी काहीही अवजार नसल्यामुळे त्यांनी हातालाच कुऱ्हाडीची ढाल बनवली. त्या साहाय्याने त्यांनी बाभळीच्या फांद्या तोडल्या आणि झाडाचे खोड तीन ते चार कर्मचाऱ्यांनी मिळून बाजूला सारले. काहीच वेळात झाड बाजूला सारल्यामुळे प्रभावित झालेली वाहतूक सुरळीत झाली.

रस्त्यावरचे झाड वाहतूक पाेलिसांनी बाजूला केले
रात्रीची वेळ आहे.. आपल्याकडे कुऱ्हाडसुद्धा नाही.. फांद्या कशा तोडायच्या.. आता तर आपली ड्युटी संपली, असे म्हणून पोलिसांनी जर या घटनेकडे दुर्लक्ष केले असते, तर झाड तसेच पडून राहिले असते. या रस्त्यावर मोठी रहदारी असल्यामुळे रात्रीतून या रस्त्यावर अपघात झाला नसता हे कशावरून. मात्र, वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे कुणाचा तरी अपघात टळला, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.