आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव ट्रेलरने चिरडले, बाळापूरनजीकच्या पोलिस केंद्राजवळ घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बाळापूरनजीक असलेल्या महामार्ग पोलिस मदत केंद्राजवळ कर्तव्यावर असलेल्या महामार्ग पोलिस कर्मचाऱ्यास भरधाव ट्रेलरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, २८ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महामार्ग पोलिस मदत केंद्राजवळ कर्तव्यावर असलेल्या नितीन महावीर निखार, वय ३२ वर्षे हे आज सकाळी ११ वाजताच्या दरम्यान महामार्गावरील पोलिस चौकीसमोर कर्तव्यावर असताना खामगावकडून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक आरजे २१ जीए ४८८४ ने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रेलरचालक वाहनासह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महामार्ग पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यास पकडले. अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रेलरचालक सत्यनारायण पेरुजी बलाई, वय ३५ वर्षे रा. कोली, ता. मनसा, जि. भिलवाडा यास पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी भेट दिली, तर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख, ठाणेदार एफ. सी. मिर्झा हे अपघातस्थळावर हजर होते.

अपघातापूर्वी अपघात झाल्याची शक्यता : ट्रेलरचा समोरचा भाग हा चपलेला होता. त्यामुळे अपघातापूर्वी कुठेतरी अपघात होऊन ट्रेलरचा समोरचा भाग चपला असावा. पूर्वीच्या अपघाताच्या भीतीने चालकाने भरधाव ट्रेलर घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काऊंटिंग गनचा वापर करावा : वेगाने वाहन चालवणाऱ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे क्रमांक मिळवून कारवाई करणे पाेलिसांना काऊंटिंग गनच्या साहाय्याने शक्य हाेणार अाहे. या काऊंटिंगगनचे शनिवारी प्रात्यक्षिकही केले. बॅटरीवर चालणारी ही काऊंटिंग गन चाैकात स्टँडवर उभी करण्यात येणार अाहे. वाहनाचा नेमका वेग किती हाेता, हे गनच्या साहाय्याने पाेलिसांना समजणार अाहे.

मित्रांना आले गहिवरून
अकोला येथील गीतानगरातील रहिवासी असलेले नितीन निखार हे आज, २८ जून रोजी सकाळी १० वाजेदरम्यान कर्तव्यावर हजर झाले होते. मात्र, काही वेळानेच काळाने त्यांच्यावर घाला घातला. मनमिळाऊ स्वभावाच्या आपल्या मित्राच्या जाण्याने महामार्ग पोलिस कर्मचाऱ्यांनासुद्धा गहिवरून आले होेते.

नितीन हाेते चॅम्पियन
पाेलिस कर्मचारी नितीन हा हाॅकी बाॅक्सिंग चॅम्पियन हाेता. त्याने राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला हाेता. ताे नवाेदित खेळाडूंना नेहमीच मार्गदर्शन त्यांना प्राेत्साहित करत हाेता. त्याच्या निधनाने पाेलिस दलासह क्रीडा क्षेत्रावरही शाेककळा पसरली अाहे.

दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरवले
अपघाताचे वृत्त अकोल्यातील गीतानगर येथील त्यांच्या घरी कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अपघातामध्ये ठार झालेल्या निखार यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले असा आप्त परिवार आहे. चिमुकल्यांचे पितृछत्र हरवल्याने आता दोन्ही मुले पितृप्रेमापासून पोरके झाले.
बातम्या आणखी आहेत...