आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, इटारसीदरम्यान झालेल्या अपघातामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - इटारसीदरम्यान कुर्ला-वाराणसी कामयानी एक्स्प्रेस आणि राजेंद्रनगर पाटणा-कुर्ला जनता एक्स्प्रेस गाडीच्या झालेल्या दुर्घटनेमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शनिवारी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला-निझामाबाद एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती, तर ऑगस्ट रोजीची गाडी नंबर ११४०५ पुणे-अमरावती एक्स्प्रेस, गाडी नंबर ११२०६ निझामाबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच १० ऑगस्ट रोजी धावणारी गाडी नंबर ११२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला-अजनी (नागपूर) एक्स्प्रेस, गाडी नंबर ११४०६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, तर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला-निझामाबाद एक्स्प्रेस आणि अमरावती-सुरत सुपर फास्ट पॅसेजर गाडी रद्द करण्यात आली.

प्रवाशांची धांदल
इटारसीदरम्यानझालेल्या दुर्घटनेमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून, अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रद्द झाल्याचा फटका रेल्वे प्रशासनासोबतच प्रवाशांनासुद्धा बसला आहे. रेल्वे रद्द झाल्याचे माहीत झाल्यावर प्रवाशांची धांदल उडाली.