आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीमध्ये वृत्त प्रकाशित होताच पारेषण वसाहतीची कामे झालीत सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट; विद्युतपारेषण कंपनीच्या कर्मचारी वसाहतीमधील विविध समस्यांबाबत "दिव्याखाली अंधार' हे वृत्त दिव्य मराठीमध्ये बुधवारी प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत पारेषण कंपनीच्या स्थापत्य विभागाचे अभियंता आणि कर्मचारी अकोटच्या वसाहतीमध्ये पोहोचले. त्यांनी त्वरित दुरुस्ती देखभालीचे काम सुरू केले आहे.

या वसाहतीमध्ये सांडपाण्याचे गटार साचले आहे, पाणीपुरवठा करणारी कूपनलिका बंद पडली आहे. पथदिवे बंद अवस्थेत आहेत आदी समस्या वृत्तामध्ये मांडल्या होत्या. हे वृत्त प्रकाशित होताच पारेषण कंपनीच्या स्थापत्य शाखेचे अभियंता प्रमोद वारुळकर हे कर्मचाऱ्यांसह पोहोचले. त्यांनी कूपनलिकेमधील बंद पडलेली पाण्याची मोटार काढून दुरुस्तीसाठी पाठवली. तसेच बंद पडलेले पथदिवेसुद्धा त्वरित बदलले. मात्र, वसाहतीमध्ये साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट त्यांना लावता आली नाही. हे काम नगरपालिका प्रशासनाचे आहे, ते त्यांच्याकडून करून घेऊ, असे ते म्हणाले.

नगरपालिकेचेदुर्लक्ष : नगरपालिकाप्रशासन दरवर्षी लाखो रुपये मालमत्ता करापोटी विविध शासकीय कार्यालयांकडून वसूल करते. मात्र, त्या कार्यालयांना किमान नागरी सोयी-सुविधा देत नाही. नगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारीवर्गाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य विभागाचा कारभारही ढेपाळला.
बातम्या आणखी आहेत...