आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transportation Committee Ignore To Transport Students

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे परिवहन समितीचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शाळासुरू होऊन महिना होत असतानाही जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाने नियुक्त केलेल्या शालेय परिवहन समितीची बैठक आणि वाहतुकीबाबत नियोजन झाले नाही. विद्यार्थी वाहतुकीसाठी जिल्ह्यातील शाळांनी कोणत्या वाहनांचा वापर केला आहे, त्यात किती विद्यार्थी बसू शकतात, याची परिवहन विभागाद्वारे दखल घेतली जात नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे.

जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अॅपेरिक्षाच्या अपघातात पाचहुन अधिक विद्यार्थी ठार झाल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. तसेच इतर ठिकाणीही विद्यार्थी वाहनांना अपघाताच्या घटना घडत असल्याने जिल्ह्यातील परिवहन समिती ऑटोरिक्षा चालकांशी शाळा मुख्याध्यापकांनी चर्चा करून सुरक्षित प्रवासाबाबत सूचना केल्या होत्या. शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शालेय बस किंवा खासगी वाहतुकीवर पालकांना अवलंबून राहावे लागते. मात्र, बऱ्याचशा शाळांकडे वाहतूक करण्यासाठी शालेय बसच नसते, शिवाय होणारी खासगी वाहतूक अनिर्बंध होत असल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीच्या दृष्टीने परिवहन विभागाने धोरण ठरवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शालेयपरिवहन समितीची आज बैठक : शालेयपरिवहन समितीची गुरुवार, २३ जुलै रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. बुलडाणा शहरात विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शालेय बस तसेच अॉटोरिक्षांचा वापर होतो. अनेकदा ऑटोरिक्षांचा वापर अनिर्बंध होतो. त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवले जाते. पैशांची बचत करण्यासाठी अनेक पालक त्यांच्या पाल्यांना अशा वाहनात दाटीवाटीने बसवण्यास तयार असतात. अशाप्रकारे पालकांमध्ये या वाहतुकीबाबत उदासीनता असून, परिवहन विभाग आणि पोलिस विभागतही उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहतुकीसंदर्भात प्रशासनाने धोरण ठरवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात २८० शालेय बसेस
जिल्ह्यातनोंदणीकृत शालेय बसेसची संख्या २८० एवढी आहे. यापैकी १५३ बसेस शाळांच्या मालकीच्या आहेत. शालेय आणि खासगी बसेसमधून होणारी विद्यार्थी वाहतूक नियमबाह्य होऊ नये याकडे परिवहन समितीने लक्ष देणे अपेक्षित आहे.

अशी आहे शालेय परिवहन समिती
जिल्हापोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीत पोलिस विभागाचे सदस्य, राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, परिवहन अधिकारी आणि शहरातील दोन शाळांचे मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. शाळा परिवहन समितीची स्थापना शालेय स्तरावर असते. मात्र, समितीचे सदस्य फारसे गंभीर दिसत नाहीत.

पालकांनी सुरक्षिततेची खात्री करावी
^दररोजहोणारे लहान-मोठे अपघात आणि परिवहन विभागाचे अपुरे संख्याबळ पाहता परिवहन विभागाला मर्यादा पडतात. तरीही शालेय वाहतुकीसंदर्भात कडक धोरण स्वीकारले जाणार आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असून पालकांनी त्यांच्या पाल्यांना सुरक्षिततेची खात्री करूनच वाहनात बसवले पाहिजे. -संदेश चव्हाण, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी

ऑटोरिक्षांची वाहतूक धोकादायक
विद्यार्थ्यांचीवाहतूक करण्यासाठी बुलडाणा शहरात रिक्षांना कोणताही परवाना नाही. मात्र, काही पैसे वाचवण्यासाठी पालक पाल्यांना ऑटोरिक्षात पाठवतात. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते.
\\