आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पावसामुळे झाडे पडली; वीज पुरवठा बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शहर परिसराला सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यादरम्यान सात ठिकाणी झाडे पडली, तर काही झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्या. यामुळे बहुतांश ठिकाणी दुपारपासून वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. 
 
सकाळी १० वाजेपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी वाजताच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि धो-धो पाऊस कोसळला. सोबतच सोसाट्याचा वारादेखील सुटला. दरम्यान, संगम चौक, सुवर्ण गणेश मंदिर परिसर, सर्क्यूलर रोड, भारत शाळेजवळ, चैतन्यवाडी परिसर, राजमाता चौक, राजपूत लेआऊटमध्ये जोरदार वादळी पावसाच्या तडाख्याने झाडे पडली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून विद्युत तारांवर पडल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्याजवळील विद्युत तारांवर झाडाची फांदी तुटून पडली. त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारागृह रोडने असलेल्या प्रवेशद्वारावर निलगिरीचे मोठे झाड पडून गेटचे नुकसान झाले. तेच झाड विद्युत तारांवरही पडले. तसेच पोलिस मुख्यालय, नगरपालिका विद्युत डीपी, सावित्रीबाई फुले नगर, पाठक गल्ली, तेलगू नगर अन्य भागांमध्ये वादळाने झाडे उन्मळून पडली. काही मिनिटेच आलेल्या वादळाने कहर केला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्या. त्यामुळे दुपारपासून वीजपुरवठा बंद झाला. 

याबाबत माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या वतीने तातडीने तारांवर पडलेली झाडे हटवून वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नव्हता. वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांच्या मार्गदर्शनानुसार अभियंता विवेक वाघ निखिलेश जाधव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. 
 
बातम्या आणखी आहेत...