आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौर्य दिनी वाहिली शुरविरांना आदरांजली, शौर्य गाथेला उजाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला : लॉर्डबुद्धा फाऊंडेशन आणि वंदना संघातर्फे भिमा काेरेगाव शौर्य दिनानिमित्त रविवारी अशाेक वाटिका येथे ४२ फूट उंच आठ फूट रुंदीच्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभाली. यावेळी या शौर्य गाथेला उजाळा देत बौद्ध बांधवांनी शुरविरांना आदरांजली वाहिली. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन आर्मीतील १३ महार बटालियनचे माजी सैनिक रतन इंगळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पाेलिस निरीक्षक राहूल आठवले, बी. आर. धाकडे, रत्नदीप शेजावळे, प्रा. प्रकाश जंजाळ यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती हाेती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करून शुरविरांना आदरांजली वाहिली. भीमा काेरेगावची लढाई ही इंग्रज आणि बाजीराव पेशवे यांच्यात हाेती. 
 
या वेळी रतन इंगळे म्हणाले की, जानेवारी १८१८ राेजी पाचशे महार सैनिकांनी तीस हजारांवर पेशव्यांच्या सैन्याचा दारुण पराभव केला. भीमा काेरेगाव विजयस्तंभाचे शिल्पकार रघुनाथ सिरसाट यांनी स्टील स्ट्रक्चर बनवले. राहूल ससाणे यांनी विजयस्तंभाला रंगसंगतीने वास्तव रुप दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पगारे यांनी केले. जीवन डाेंगरे यांनी आभार मानले. 
शौर्याचे प्रतीक विजयस्तंभ 
या लढाईत पेशवाई साम्राज्याचा अंत केला. अन्यायावर न्यायाची माेहाेर उमटली. या लढाईच्या शौर्याचे प्रतीक म्हणून लॉर्ड बुद्धा फाऊंडेशनतर्फे अशाेक वाटिका येथे ४२फूट उंच आठ फूट रुंदीचा विजयस्तंभाची प्रतिकृती साकारली. भीमा काेरेगाव विजयस्तंभाचे शिल्पकार रघुनाथ सिरसाट यांनी स्टील स्ट्रक्चर बनवले. राहूल ससाणे यांनी विजयस्तंभाला रंगसंगतीने वास्तवरुप दिले. 
 
बातम्या आणखी आहेत...