आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणारजवळ वाळूच्या ट्रकची इंडिका कारला जबर धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूच्या ट्रकची आग विझवताना अग्निशामक दलाचा कर्मचारी. - Divya Marathi
वाळूच्या ट्रकची आग विझवताना अग्निशामक दलाचा कर्मचारी.
लोणार- वाळूचीवाहतूक करणाऱ्या ट्रकने समोर असलेल्या इंडिका कारला जबर धडक दिली. या अपघातात कोणीच जखमी झाले नसले तरी इंडिका कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही घटना सोमवार, सात सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मंठा-लाेणार मार्गावरील कमळजा पेट्रोलपंपाजवळ घडली. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे सतत अपघाताच्या घडना घडत असल्याने संतप्त नागरिकांनी हा ट्रक पेटवून दिला.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या तळणी येथील नदीच्या वाळूघाटातून सोमवारी सकाळी एक ट्रक वाळू घेऊन लोणारकडे येत होता. कमळजा पेट्रोलपंपाचे मालक तथा नगरसेवक भूषण मापारी या वेळी इंडिका कारने पेट्रोलपंपावरून निघाले होते. मात्र, राज्य महामार्गावर जाताच मागून वाळूच्या ट्रकने त्यांच्या कारला जबर धडक दिली. या अपघातात सुदैवाने मापारी जखमी झाले नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रकला आग लावली. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन ट्रकची आग विझवली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

नागरिकांनी व्यक्त केला संताप
तळणीनदीतून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. चालक ट्रक भरधाव चालवत असल्याने अनेकदा अपघात झाले असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १५ दिवसांपूर्वीच ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेदरम्यान नागरिकांनी ट्रक पेटवून देत संताप व्यक्त केला.