आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची बसला धडक; 8 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भरधावट्रकने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिली. त्यामध्ये चालकासह प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात बाभुळगाव फाट्याजवळील राजहंस ढाब्याजवळ सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडला.
बुलडाणा आगाराची एमएच ४० वाय ५६९५ क्रमाकांची नागपूर-बुलडाणा बस ही सोमवारी सकाळी सहा वाजता नागपूरहून बुलडाण्याकडे निघाली होती. ११.३० वाजता ती राजहंस ढाब्याजवळ आली असता अमरावतीकडे जाणाऱ्या खाद्यतेलाने भरलेल्या ट्रकने समोरून चालकाच्या दिशेने जोरदार धडक दिली आणि ट्रक उलटला. या वेळी बसमधील प्रवाशांसह चालक सुनील श्रीराम शेळके वय ३१ रा. शिरपूर, बुलडाणा, हे जखमी झाले, तर बसमधील ४० प्रवाशांपैकी आशा पुंडलिक वानखडे वय ४० रा. पळशी झांशी, सुभाष मोतीराम पवार वय ४५ पिंपळगाव हरडे, मंदा पितांबर वानखडे वय ४०, बोरगाव, नारायण भीमसिंग सोळंके वय ३५, चांदूर, पंचफुला आनंद टोलारे वय ६८ मधापुरी, योगेश ठाकरे वय ४३ मधापुरी, लता योगेशराव माटे वय ३०, नागपूर आणि रुक्मिणीबाई पंडित वय ४५ अकोला हे जखमी झाले. जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली जखमींना सानुग्राह म्हणून प्रत्येकी हजार रुपयांची मदत दिली.

चालकांची साधी विचारपूस नाही
अपघातझाल्यानंतर बसचे वाहक यांनी पाठीमागून आलेली एक बस थांबवली. त्यामध्ये चालकासह जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळाने एसटीचे अधिकारी रुग्णालयात गेले. या वेळी अधिकाऱ्यांनी प्रवाशांची चौकशी केली. मात्र, आपल्या चालकाची साधी विचारपूसही केली नाही. पोलिसांनीही दुपारी चार वाजेपर्यंत या जखमी चालकाचे बयाण नोंदवले नव्हते.
ट्रकने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला धडक दिल्याने अाठ जण जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...