आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवाहू ट्रक 150 फुट नदीपात्रात कोसळला, दोघे जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू/कुरणखेड- बोरगावमंजू पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेड येथील काटेपुर्णा नदीच्या पुलावरून मालवाहू ट्रक नदीपात्रात १५० फुटांवर कोसळला. यामध्ये ट्रकमधील दोघेजण जागीच ठार झाले. 

ट्रक क्रमांक एनएल ०२ एल ५९६७ हा मालवाहू ट्रक कलकत्ता येथे कांदा घेऊन जात होता. दरम्यान, काटेपुर्णा नदीच्या पुलावरून पहाटे वाजताच्या सुमारास १५० फुट खाली नदी पात्रात पडला. त्यामुळे ट्रकचा चुराडा झाला. 

यामध्ये ट्रक चालक दारसिंग राणा रा. दिल्ली त्याचा सहकारी क्लीनर निर्मलसिंग सुरजितसिंग रा. कलकत्ता हे दोघेही जागीच ठार झाले. त्यांना बोरगावमंजुचे ठाणेदार पी. के. काटकर, पोलिस संजय तेलंग, संजय इंगळे, शशिकांत पाटील, कैलास गवई, पुरुषोत्तम धांडे, प्रकाश गवळी, मूर्तिजापूर येथील लकी अग्रवाल तसेच बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढण्यासाठी मदत केली. मृतकाच्या नातेवाईकांना फोनवरून घटनेची माहिती देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनसाठी रवाना केले. 
बातम्या आणखी आहेत...