आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक चालकाची हत्या, चालकाचा सोबती फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर -  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहिनूर ढाब्याजवळील आसरा फाट्यावर एका ट्रक चालकाची हत्या करून सोबतचा आरोपी फरार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. 
 
ट्रक क्रमांक जीजे ०३ एझेड ११३३ चा चालक अजहर शेख अकबर अली हा उत्तरप्रदेशमधील कटरीया जिल्ह्यातील भानापूर येथील रहिवासी होता. ते महामार्गावरून जात असताना मूर्तिजापूरदरम्यान क्लिनर चालकाचा सोबती आदिल खान याच्यासोबत पैशांवरून वाद झाला. 
आदिल खानने लोखंडी विलच्या अवजाराने डोक्यावर जबर वार करून ट्रक चालक अजहर शेख याची हत्या केली. पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेहाला ट्रकच्या कॅबिनमधील सीट खाली लपवून ठेवण्यात आले होते. गुजरातमधील समई ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक हनिफ भाई हे गत तीन ते चार दिवसांपासून चालकाच्या सोबत संपर्कात होते. संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्या संपर्कातील बी. जे. शंकर प्रजापती यांना ट्रकचा शोध घेण्यासाठी सांगितले. 

दरम्यान, ट्रकचा शोध घेत असताना महामार्गावर ट्रक आढळून आला. त्यावेळी ट्रकच्या कॅबिनमध्ये चालकाचा मृतदेह दिसून आल्याने खळबळ उडाली. यावरून बी. जे. प्रजापती यांनी मूर्तिजापूर शहर पोलिसात तक्रार दाखल केली. ट्रक चालकाचा सोबती फरार असल्याने त्याच्याविरुद्ध कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश कोथळकर करत आहेत. 

 
बातम्या आणखी आहेत...