आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची समाेरासमोर धडक, दोन जण गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामठी बु.- दाेनट्रकची धडक झाल्याने चालकासह दाेन जण गंभीर जखमी झाल्याची घटना माना फाट्याजवळ बुधवारी सकाळी अडीच वाजता घडली. ट्रक क्रमांक एमएच १२ एफसी ७२०६ हा अकोल्याकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्रमांक डब्ल्यूबी ४१ ७०४९ यांची माना फाट्याजवळ धडक झाली. या अपघातामध्ये ट्रक क्रमांक एमएच १२ एफसी ७२०६ चा चालक संपत अंकुश फस्के (वय ३५) क्लीनर प्रकाश भगवान फस्के (वय २०) दोघेही रा. औरंगपूर ता. केज, जि. बीड हे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच माना पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सुनील ठाकूर चालक नागे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी मूर्तिजापूर येथे नेले. येथून त्यांना अकोला येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, दुसऱ्या ट्रकचा चालक फरार झाला अाहे. याप्रकरणी माना पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत अवताडे विनोद तायडे करत आहेत.
माना फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये ट्रकचे असे नुकसान झाले.