आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीतून तेल्हाऱ्यात येणारा गुटख्याचा ट्रक पकडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मध्यप्रदेशातून हिवरखेडमार्गे तेल्हाऱ्यात गुटखा घेऊन येणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये तीन लाख रुपयांच्या गुटख्यासह मालवाहू ट्रक पोलिसांनी जप्त केला. कारवाईवरून मध्य प्रदेशातून गुटखा माफिया जिल्ह्यात गुटखा आणत असल्याचे शिक्कामोर्तब झाले.

मध्य प्रदेशातून गुटख्याने भरलेला ट्रक तेल्हाऱ्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी हिवरखेड येथील झरी रोडवर सापळा लावला होता. दुपारी एमएच ३० एल ३९०४ क्रमांकाचा मालवाहू ट्रक आल्यानंतर पोलिसांनी त्याला मोनिका बारसमोर अडवले. या वेळी पोलिसांनी तपास केला असता ट्रकचालक सलामखाँ वकील खाँ याने ट्रकमध्ये गुटखा असल्याचे सांगितले. या वेळी ट्रकमध्ये गुटख्याचा मालक शेख रशीद शेख युसूफ वय २८ हासुद्धा होता. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन, त्यांना अकोला येथे आणले. या वेळी पोलिसांनी तीन लाख रुपयांचा गुटखा आणि चार लाख रुपयांचा ट्रक, असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचालक सलामखाँ वकील खाँ आणि गुटखा माफिया शेख रशीद शेख युसूफ याला अटक केली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, हेडकॉन्स्टेबल नरेंद्र चऱ्हाटे, सुलतान खान पठाण, सुनील टोपकर यांनी यांनी केली.

"अन्न, औषध'ची होतेय डोळेझाक
जिल्ह्यामध्ये तेल्हारामार्गे आणि आणि अकोटमार्गे मध्य प्रदेशातून गुटखा येतो हे सर्वश्रुत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात होत असताना अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहीत कसे होत नाही, हा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून तेल्हारा आणि अकोट येथे एकही कारवाई अन्न प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे गुटख्याच्या आयातीकडे अन्न प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिवरखेड येथून ट्रक ताब्यात घेतला.
बातम्या आणखी आहेत...