आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-टँकरचा अपघात; दोन ठार, ३५ जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महामार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ ट्रक टँकरची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी वाहतूकीचा खाेळंबा झाला हाेता. पाेलिसांनी वाहतूक सुरळीत केली. - Divya Marathi
महामार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ ट्रक टँकरची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी वाहतूकीचा खाेळंबा झाला हाेता. पाेलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
बोरगावमंजू - लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रक टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टँकरचालक एक वृद्ध वऱ्हाडी हे दोघे जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ घडली. अपघातात पेट्रोलने भरलेला ट्रक फुटला. मात्र, सुदैवाने त्याने पेट घेतला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सुकळी नंदापूर येथील वऱ्हाड घेऊन जाणारा एमएच ३०, एल १५५० क्रमांकाच्या ट्रक अकोल्यावरून मूर्तिजापूरकडे जात असलेला एमएच २७, सी ६४० क्रमांकाचा पेट्रोलने भरलेला टँकर यांच्यात जबर धडक झाली. यामुळे टँकर खाली कोसळला. त्यामधील ड्रायव्हर शंकर मधुकर मानकर (वय ५०) रा. वलगाव रोड, अमरावती हा जागीच ठार झाला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये जवळपास ४६ प्रवासी होते. त्यामधील श्यामराव सावळे (वय ५५) रा. टेंबी ता. बार्शिटाकळी हे जागीच ठार झाले. तसेच सुरेश पंढरी गवई (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. भीषण अपघातात ३४ वऱ्हाडी जखमी झाले असून, त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.

पोलिसांनी घेतली घटनास्थळावर धाव : अपघातानंतरअप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे ठाणेदार घन:शाम पाटील, एमआयडीसीचे ठाणेदार शिरीष खंडारे, बोरगावमंजूचे ठाणेदार भास्कर तंवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी तत्काळ जखमींना रुग्णालयात हलवले. या ठिकाणी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या, तीन अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या. बोरगावमंजू पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

मोठा अनर्थ टळला
राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोणीतरी आग लावलेली होती. सुदैवाने अपघात त्याच जागेवर घडला नाही. अपघात हा तेथून २५ फुटांच्या अंतरावर झाला. आगीच्या ठिकाणी अपघात झाला असता तर टँकरचा भडका होऊन अनर्थ झाला असता. सुदैवाने तो अनर्थ टळला.