आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलच्या आवारातून धान्याचा ट्रक गेला चोरीला; तपासात पाेलिसांची दिरंगाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तहसिल कार्यालयातून चोरीला गेलेल्या ट्रक प्रकरणी ट्रकचालकाविरुद्धच पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. मंगळवारी ट्रक चालकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी ट्रकचालकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सर्वात आधी ट्रक चोरीला गेल्यानंतर ट्रकचालकानेच पोलिसात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी ती दाखल केली नव्हती. 
 
शुक्रवार-शनिवारच्या रात्री जबीउल्ला खान यांचा रेशनच्या धान्याने भरलेला ट्रक पातूर तहसिल कार्यालयाच्या आवारातून चोरीला गेला होता. या प्रकरणी जबीउल्ला खान यांना रात्री अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले की तुमचा ट्रक बाळापूर रोडवर आहे. त्यानंतर ट्रकचालक जबीअल्ला खान तत्काळ तहसिलच्या आवारात पोहचले. मात्र त्यांना ट्रक दिसला नाही. त्यांनी लगेच पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. त्यानंतर त्यांनी स्वत: ट्रकचा शोध घेतला त्यांना दिग्रस फाट्याजवळ ट्रक दिसून आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चालक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केली होती. 

या तक्रारीत त्यांनी अज्ञात व्यक्तीने आपला ट्रक चोरून नेल्याचे म्हटले होते. तसेच ट्रकमध्ये जीपीएस असल्याने तपास करून आरोपीविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र पातूर पोलिसांनी या प्रकरणी त्यांची तक्रार घेतली नव्हती. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी कंत्राटदाराने पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्धच गुन्हा दाखल केला ट्रकचालकाच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. मंगळवारी या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने आदेशात म्हटले की, जेव्हा ट्रक चालकाने तारखेला तक्रार दिली तर पोलिसांनी त्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना ती केली नाही. आरोपी पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावता न्यायालयीन कोठडी सुनावली पोलिसांच्या तपासावरच मुद्दे उपस्थित केले. 
 
आरोपीनेच दिली होती पोलिसांना सर्व माहिती 
जरट्रकचालक मालकानेच पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ती दाखल करून घेतली नाही. उलट त्यालाच ट्रक शोधण्याचे सांगितले. तक्रारीत ट्रकचालकाने त्याला अज्ञात व्यक्तीने फोनवरून ट्रक चोरीला गेल्याची दिलेली माहिती तसेच ट्रकमध्ये जीपीएस असल्यामुळे ट्रकचे खरे लोकेशनही त्याने दिले होते. मात्र या सर्व बाबीचा तपास करण्यात आला नव्हता. हे सर्व मुद्दे आरोपीच्या वतीने न्यायालयात उपस्थित करण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...