आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न फसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरखेड - अकोल्यातील नराधम मामाने अल्पवयीन भाचीला आश्रमशाळेतून दुचाकीने अकोट तालुक्यातील अकोलखेड शिवारात आणून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच अकोल्यात शिकत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील अकोली रूपराव येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन नराधमांचा अत्याचाराचा प्रयत्न फसल्याची घटना गुरुवार, सप्टेंबरला रात्री घडली. मुलीने प्रसंगावधान राखून स्वत:ची अब्रू वाचवली. या प्रकरणी ऑटोचालक त्याच्या मित्राला अटक केली आहे.
अकोल्यात शिकणारी अकोली रूपराव येथील १७ वर्षीय मुलगी कागदपत्रे काढण्यासाठी गावी आली होती. तेल्हारा तहसीलमध्ये गुरुवारी कागदपत्रांचे काम झाल्यानंतर ती सायंकाळी वाजता ऑटो स्टँडवर गावाकडे जाणाऱ्या आॅटाेत बसली. ऑटोचालक गावातीलच होता. मात्र, अधिक प्रवासी येईपर्यंत ऑटो निघणार नाही, असे ऑटोचालक हर्षद तायडे (वय २२ वर्ष) याने तिला सांगितले. या वेळी हर्षदसोबत त्याचा अकोली येथीलच मित्र आकाश खिराडे (वय २२ वर्ष) हा सुद्धा ऑटोत होता. दोन तासानंतरही प्रवासी आले नाहीत. त्यामुळे सायंकाळी वाजतानंतर ऑटो गावाकडे निघाला. चालक हर्षदच्या बाजुला आकाश बसला होता, तर मागच्या सिटवर विद्यार्थिनी बसली होती. बेलखेडवरून ऑटो अकोलीकडे वळला. हर्षद आकाश यांची चर्चा सुरू असतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेत असलेल्या कॅनालजवळ चालकाने ऑटो थांबवला. त्यानंतर आकाश मागच्या सिटवर बसल्याने विद्यार्थिनीला असुरक्षित वाटले. काही वेळाने तिच्याशी त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत विद्यार्थिनीने या प्रकाराला विरोध केला. दुसरीकडे चालक हर्षद ऑटो वेगात चालवत होता. विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. तिने नराधमांचा डाव ओळखून विरोध सुरूच ठेवला. त्यानंतर गाव जवळ आल्याने आकाशच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले. ऑटोतून उतरून विद्यार्थिनीने पळ काढला. घरी पोहोचताच तिने सर्व घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी रात्री ९.३० वाजता तातडीने हिवरखेड पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांपुढे विद्यार्थिनीने घटनाक्रम कथन केला. पोलिसांनी ऑटोचालक हर्षद तायडे आकाश खिराडे यांच्याविरुद्ध कलम ३५३ अ, ५०६, १०९ पास्को अंतर्गत गुन्हे दाखल केले. शुक्रवारी सकाळी दोघांनाही अटक केली. गुन्ह्यात वापरलेला ऑटोही पोलिसांनी जप्त केला. आज दुपारी दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल गवई करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...