आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर लवकरच पुन्हा बंद हाेणार तूर खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - बारादान्याचा पुरवठा लवकर झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडची तूर खरेदी बंद हाेऊ शकते, अशी शक्यता साेमवारी काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या त्यामुळे ताेपर्यंत असेच ताटकळत बसावे लागणार असून, हाेणाऱ्या गैरसाेयीला काेण जबाबदार राहिल , असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात अाला. 

नाफेडकडून शेतकऱ्यांना ५०५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी शासनाच्या खरेदी केंद्रावर माल आणत आहेत. यंदा तुरीची अावक वाढली. मात्र माप व्यवस्थित होत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत अाहे. गत अाठवड्यात बारदाना संपल्यामुळे अडचण निर्माण झाली हाेती. त्यानंतर बारदाना उपलब्ध झाल्याने पुन्हा माप सुरु झाले. 
 
नियाेजनशू्न्य कारभार : नाफेडच्या नियोजनशून्य कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त हाेत अाहे. शेतकऱ्यांवर पंधरा-वीस दिवसांपासून मालासोबत उघड्यावरवर जगण्याची वेळ अाली अाहे. यातून मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांमधून हाेत अाहे. याबाबत नाफेडचे जिल्हा विपणन अधिकारी मनोज वाजपेयी यांच्याशी माेबाईल फाेनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 
 
दलालांचीचांदी : बाजारसमिती परिसरात दलाल सक्रिय असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांच्या गाड्याही मध्येच घुसवण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत अाहे. तसेच शेतकऱ्यांच्या नावावर काही व्यापारी तूर विकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे राेखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...