आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूरीची खरेदी पुन्हा सुरु होण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शनिवार २२ एप्रिल १७ पर्यंत बाजार समितीच्या आवारामध्ये असणाऱ्या वाहनांची तूर खरेदी करण्याची तयारी शासनाने दाखवली आहे. परंतु या बाबत अद्याप निर्देश आलेले नसल्यामुळे खरेदी प्रक्रिया नव्याने केव्हा सुरू होणार या बाबत शेतकऱ्यांना उत्सूकता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांना एकेक दिवस मोजावा लागत आहे. दरम्यान अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ६३५ वाहने उभी आहेत. 
नाफेडची यंत्रणा, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तूर केव्हापासून पुन्हा खरेदी करायची याविषयी निर्देश नाहीत. त्यामुळे कोणीही सांगायला तयार नाही. शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तुरीचे माप लवकर होत नाही ही काळजी आणि डोक्यावर रणरणते उन असा मार त्यांना सहन करावा लागत आहे. वाहन आणि रोजचा खर्च वेगळा. शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मोकळे झाले की खरीपाची तयारी करायची आहे. बाजारातून बियाणे खरेदीसाठी त्यांना पैशाची गरज आहे. खुल्या बाजारामध्ये तूर विकल्यास हजार रुपयांचे नुकसान होते. ती झळ सहन करण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही. 

व्यापारी ४१०० रुपयांनी करताहेत खरेदी :कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी ४०५०-४१०० रुपये प्रमाणे तुरीची खरेदी करत आहेत. नाफेडच्या दराचा विचार करता हजार रुपयांचा फरक आहे. ज्यांना पैसा मोकळा करायचा आहे ते शेतकरी व्यापाऱ्यांना माल देत आहेत. परंतु बहुतांश शेतकरी नाफेडद्वारेच खरेदीची वाट पाहत आहेत. ५०५० रुपये दर सोडायला ते तयार नाहीत. तूर उत्पादक शेतकरी यंदा चांगलाच कैचीत सापडला आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने तुरीची खरेदी पुन्हा सुरु करण्याचे आदेश द्यावे,अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 
 
‘नाफेडच्यातूर खरेदी केंद्रावर माेजमाप सुरू झाल्यास गुरुवारी २७ एप्रिलला थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या अांदाेलन करण्यात येईल,’ असा इशारा शिवसेनेने दिला अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी २२ एप्रिलपर्यंतची नाफेडच्या खरेदी केंद्रावर नाेंद झालेली शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करण्यात येईल, असा निर्णय मंगळवारी २५ एप्रिलला जाहीर केला हाेता. मात्र, अकाेल्यात तसा लेखी अादेश धडकल्याने अद्याप तूर खरेदी सुरू हाेऊ शकली नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावर तूर घेऊन आलेले असंख्य शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तुरीचा पेरा करण्याचे अावाहन केले हाेते. या अावाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी तुरीची विक्रमी पेरणी केली. पाऊसही समाधानकारक झाल्याने यंदा तुरीचे उत्पादन जादा हाेणार अाहे, हे माहीत असतानाही नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शासकीय यंत्रणांकडून व्यवस्थित नियाेजन केले नाही. त्यासोबतच अनेकदा एेन वेळेवर बारदाना संपल्यामुळे तुरीची खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली हाेती. अशातच शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापारी दलालांनीही तूरीच्या विक्रीचा सपाटा लावला हाेता. अशातच शनिवारी २२ एप्रिलला संध्याकाळी नाफेड खरेदी केंद्रावर तूर माेजण्याची प्रक्रिया बंद झाली. त्यामुळे साेमवारी २४ एप्रिलला शिवसेनेने दि महाराष्ट्र स्टेट काे-अाॅप. मार्केटिंग फेडरेशनच्या येथील जिल्हा कार्यालयावर हल्लाबाेल करत थेट डीएमअाेंवर (जिल्हा मार्केटिंग अधिकारी) तूर अाेतली हाेती. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली होती. 

दरम्यान तुरीचे माेजमाप पुन्हा सुरू करण्याची मागणी करत शिवसैनिकांनी डीएमअाेंना खासगी लक्झरी बसमध्ये बसवून थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये असलेल्या खरेदी केंद्रावर नेले होते. त्या ठिकाणी तुरीचे माेजमाप सुरू झाल्याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हटणार नाही, असा अाक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी त्या वेळी घेतला हाेता. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली शिवसैनिकांशी चर्चा केली. त्यासोबतच राज्य शासनाकडून अादेश अाल्यास खरेदी केंद्रावरील तुरीचे माेजमाप पुन्हा सुरू करण्यात येईल, असे सांगितले हाेते. 

शिवसेनानेत्यांची झाली तातडीची बैठक 
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयनंतरही नाफेड तूर खरेदी केंद्रावर तुरीचे माेजमाप सुरु झाल्याने बुधवारी २६ एप्रिलला दुपारी शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक झाली. त्यात या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचेही ठरले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने भेट रद्द केली. त्यामुळे गुरुवारी २७ एप्रिलला जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय यांची भेट घेण्यात येणार अाहे. 

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर तातडीने तूर खरेदी सुरु झाल्यास तेथेच शिवसेनेच्या वतीने ठिय्या अांदाेलन करण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात अाला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख बंडू ढाेरे, निवासी उपजिल्हा प्रमुख गाेपाल दातकर, अकाेला पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, नकूल ताथाेड अादींसह अनेक पदाधिकारी उपस्थित हाेते. 

तूर खरेदीचा विषय त्वरेने मार्गी लागावा 
^गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समितीमध्ये तूर खरेदीचा विषय सुरू आहे. ही प्रक्रिया आता तातडीने पूर्ण झाली पाहिजे म्हणजे शेतकरी तसेच खरीददार दोघेही मोकळे होतील. शासनाचे लक्ष याकडे वेधले आहे. शिरीशधोत्रे, सभापती, कृउबा समिती अकोला. 

तूर खरेदीचे निर्देश अद्याप आलेले नाहीत 
^शनिवारी २२ एप्रिलची मुदत संपल्यामुळे नव्याने तूर खरेदी सुरू करण्याबाबत अद्याप निर्देश प्राप्त झालेले नाहीत. आदेश आले की खरेदी तातडीने तुरीची सुरू करता येईल. त्यामध्ये कसलीच अडचण येणार नाही. मनोजवाजपेयी, जिल्हा विपणन अधिकारी. 

जिल्ह्यातील केंद्रनिहाय तूरीबाबतची असलेली स्थिती 
केंद्रखरेदी झालेली माेजनीविना पडून (क्विं.) 
अकाेला ८६हजार ६०५ ३९ हजार ७५० 
अकाेट ५९ हजार ९९० २४ हजार ५०० 
तेल्हारा ३९ हजार ६३६ १५ हजार 
मूर्तिजापूर ४० हजार ५४० १२ हजार 
बार्शिटाकळी ३९ हजार ९०० २२ हजार 
एकूण:- २६६६७१ ११३२५० 
कृषी उत्पन्न बाजार समितीतील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रावर काही दिवसांपासून तूर खरेदीच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांची वाहने. या वाहनातील तुरींची राखणही शेतकऱ्यांना करावी लागत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...