आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत लुटमार करणाऱ्या दोघांना पकडले, फेकण्याची दिली धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रेल्वेतलुटमार करणाऱ्या दोघांना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान लोहमार्गाच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून पकडले. हावडा येथील एका युवकाला गाडीतून फेकण्याची धमकी देत त्याच्याकडून दोन हजार रुपये त्यांनी हिसकले होते. ही कारवाई अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी वाजता आझाद हिंद एक्स्प्रेसच्या जनरल डब्यामध्ये करण्यात आली. 

प्रत्येक गाडीमध्ये आरपीएफचे जवान पेट्रोलिंग करीत असतात. मंगळवारी सकाळी पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस अकोला रेल्वेस्थानकावर पोहचली. त्यापूर्वी या डब्यात भुसावळहून रोहीत अशोक लोखंडे (२४ रा. सरकारी कॉलनी शेगाव) तन्वीर अहमद अली (वय २४ सिंधी कॅम्प अकोला) हे दोघे जनरलच्या डब्यात बसलेलेे होते. या दोघांनी पुण्याहून बसलेल्या शाहरुख मिस्त्री जाकीर हुसेल मिस्त्री(वय २०) या मजुरी करणाऱ्या युवकाला धमकावले गाडीतून फेकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या शाहरुखकडून त्यांनी दोन हजार रुपये हिसकावून घेतले. अकोला रेल्वेस्थानकावर गाडी थांबल्यानंतर शाहरूखला आरपीएफ जवान दिसले. तो त्यांच्याकडे रडत गेला त्याने आपबिती सांगितली. यावेळी आरपीएफचे आशू शर्मा, एएसआय सोबरनसिंग, कॉन्स्टेबल अनुप अब्राहम, संतोष शेट्ये, अनिल गई तसेच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे ठाणेदार एस.डी. वानखडे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप वानखडे जीआरपीएफ पोलिस जवानांनी डब्यात चढून दोघांनाही पकडले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली. 

जवानांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला 
आरपीएफचेठाणेदार राजेश बढे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्थानकावर प्रत्येक गाडीची तपासणी होते. तसेच जीआरपीएफचे ठाणेदार एस.डी. वानखडे यांचे पथकही सतत पेट्रोलिंग करीत असते. त्याचा परिपाक म्हणजे रेल्वेस्थानकावरील अनेक अनुचित घटनांना आळा बसण्यास मदत होते. 
बातम्या आणखी आहेत...