आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा: जिल्ह्यामध्ये चोऱ्या करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिस कोठडी, गुन्हे शाखेची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- जिल्ह्यासह परजिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. यावेळी त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज १४ फेब्रुवारी रोजी संगम चौकात करण्यात आली आहे. दरम्यान आज सदर आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला होता. प्रकरणी शहर पोलिसांनी चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता. जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथे घरफोडी केली होती. या घरफोडी प्रकरणातील आरोपी किशोर तेजराव वायाळ वय ३४ रा. मेरा बुद्रूक लहू दगडू धंदरे वय २४ वर्षे रा. किनगाव जट्टू हे शहरातील संगम चौकात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने संगम चौकात सापळा रचला.
 
हे अाराेपी चौकात येताच त्यांनाे पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर आरोपीची चौकशी केली असता त्यांनी लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून सोन्या चादींच्या दागिन्यांसह लाखोंचा माल जप्त केला. दरम्यान दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे केल असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासा दरम्यान आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर अप्पर पोलिस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिकारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक कारेगावकर, पोहेकॉ केशव नागरे, विलास काकड, नंदकिशोर धांडे, अविनाश जाधव, विजय दराडे, चालक गजानन जाधव, विवेक तायडे गजानन शेळके यांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...