आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Arrested In The Case Of Illegal Gun Smuggling

पिस्टलसह काडतुसांची तस्करी; अकोटफैल परिसरात दोघे जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पिस्टल चार जिवंत काडतुसे घेऊन येणाऱ्या शेगाव येथील दोघांना अकोट पोलिसांनी पकडले. बुधवारी रात्री १०.३० वाजता पोलिसांनी सापळा रचून अकोटफैल पुलावरून अकोटफैलच्या दिशेने जाणाऱ्या ऑटोला अडवून ही कारवाई केली. कुणासाठी आरोपी शस्त्रांची तस्करी करतात, याचा तपास पोलिस करत आहेत.
शेगाव येथील पंचशीलनगरात राहणारे सुदर्शन उर्फ गोलू गोपाल उरकुंडे (वय २२) राहुल शिवाजी शिरसाट (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही आरोपी शेगावहून धनंजय विश्वनाथ बोरडे याच्या ऑटो क्रमांक एमएच ३८-३९८६ मधून अकोटफैलमध्ये बेकायदेशीररीत्या पिस्टल काडतुसे विक्रीसाठी घेऊन येत अाहेत, अशी माहिती अकोटफैल पोलिसांना मिळाली. त्यावरून अकोटफैल पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक डी. एस. शिंपी, पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनकर गुडदे, सुरेश वाघ, अश्विन सिरसाट, मनोज नागमते, अमर इंगळे, रवी घिवे, ज्ञानेश्वर लांडे आणि दोन सरकारी पंच यांनी रेल्वे ओव्हर ब्रीज येथील शिव मंदिराजवळ सापळा रचला. ठरल्यानुसार रात्री १०.३० वाजता आॅटो ओव्हर ब्रीजवरून खाली अकोटफैलच्या दिशेने येताना दिसून आला. त्याला पोलिसांनी थांबवले, त्यात दोघे जण बसून होते. दोघांनीही पोलिसांना सुदर्शन उर्फ गोलू गोपाल उरकुंडे राहुल शिवाजी शिरसाट, अशी नावे सांगितली.

पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता गोलूकडून एक लोखंडी काळ्या सिल्व्हर रंगाचे लाइनिंग डिझाइन असलेले पिस्टल अग्निशस्त्र देशी बनावटीचे ६.७ इंच लांबीचे बॅरेल ३.५ इंच पिस्टल ग्रिप असलेले पिस्टल तसेच राहुल शिवाजी शिरसाट याच्या पॅन्टच्या खिशात चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी पिस्टल काडतुसे जप्त केली आहेत. या दोघांवरही रात्री उशिरा भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शिरीष खंडारे यांचे पथक करत आहे.