आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतातील सिमेंट बंधाऱ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा करुण अंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव मंजू- परिसरात असलेल्या शेतातील सिमेंट बंधाऱ्यात पोहण्यास गेलेल्या परशुराम नाईक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून करुण अंत झाल्याची घटना मंगळवार, ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान घडली. घटनेनंतर पालक ग्रामस्थांनी विद्यालयावर धडक दिली. दरम्यान, हजेरी पटावर हजर असलेले दोन्ही विद्यार्थी मृत्यूनंतर गैरहजर दाखवल्याने पालक संतप्त झाले. ग्रामस्थांनीही शाळेतील शिक्षकांना धारेवर धरले.

रामजीनगरस्थित अरुण लागे यांचा मुलगा अनिल वय १४ वर्षे, इयत्ता वी संजय सोळंके यांचा मुलगा श्याम, वय १३ वर्षे, इयत्ता वी हे येथील परशुराम नाईक विद्यालयात शिकतात. नियमितपणे मंगळवारीही ते शाळेत गेले. दरम्यान, अनिल हा इयत्ता वी तर श्याम हा इयत्ता वीच्या वर्गातील हजेरी पटावर हजरसुद्धा असल्याचे नमूद आहे. असे प्रत्यक्षदर्शी दिसून येत असले तरी दुपारी येथील दाते यांच्या शेताजवळ एका सिमेंट बंधाऱ्यात बुडाल्याने त्यांचे मृतदेह दिसून अाले. दरम्यान, घटनेची माहिती बोरगावमंजू पोलिसांना मिळाल्यावरून घटनास्थळावर ठाणेदार भास्कर तवर यांनी आपल्या ताफ्यासह धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले. हेड कॉन्स्टेबल निमकंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला. तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांच्या सुचनेवरून नायब तहसीलदार तेजणकर, मंडळ अधिकारी सुनील देशमुख, कवळे, चोपडे, म्हैसने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच कुटुंबीयांची भेट घेतली.

सद्य:स्थितीत तुकडी निकषाप्रमाणे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पळवापळवी होत आहे. यासाठी पालकांना आमिषही दाखवण्यात येते. तुकडी निकष पूर्ण करण्यासाठी परिसरातील गावातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी स्कूल बसमध्ये कोंबून आणल्या जात आहेत. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. हा प्रकार थांबवण्यात यावा, अशी मागणी करत पालकांनी गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले.
पोलिसांनी हजेरीपट घेतले ताब्यात
प्रथमदर्शनी दोन्ही विद्यार्थी हजर असताना मृत्यूनंतर गैरहजर कसे, असा सवाल करत पालकांनी शिक्षकांना धारेवर धरले. प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून पोलिसांनी विद्यालयात पोहोचून पालकांची समजूत काढली. तसेच हजेरीपट ताब्यात घेऊन योग्य चौकशी करून न्याय देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितल्याने पालक शांत झाले.

मुले शाळेत गैरहजर
या घटनेत मृत्युमुखी पडलेली दोन्ही मुले शाळेत आलीच नव्हती, असे वर्गशिक्षकांनी सांगितले. हजेरीपत्रकाबाबत काही सांगता येणार नाही. त्याची माहिती घेण्यात येईल. त्यानंतरच याबाबत सांगता येईल.’’ एस.एस. वाडकर, प्राचार्य.

शिक्षक संवेदनाहीन
शाळेचे एकही शिक्षक मुलांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत. त्यांची संवेदनशीलता हरवली. पालक ऑगस्टला विद्यालयावर मोर्चा काढणार आहेत. विद्यार्थ्यांना गैरहजर का दाखवल्याचा जाब विचारणार आहे.’’ सुहाससोनोने, शहराध्यक्ष, भाजप

संस्था, शिक्षकांवर कारवाई करावी
आम्ही मजूर असून, आम्ही शिक्षकांच्या भरवशावर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतो. ते शाळेतून बाहेर गेलेच कसे. हजर असूनही आमच्या मुलांना गैरहजर दाखवणाऱ्या वर्गशिक्षकांवर तसेच संस्थेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अरुण लागे संजय सोळंके यांनी केली आहे.

हजेरी पुस्तकारवर केली खाडाखोड
घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान, मृतक दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांवर संकटच कोसळले. सकाळी आपली मुले शाळेत दप्तर घेऊन गेली होती. ही मुले शाळेत होती की नव्हती ही माहिती घेण्यासाठी पालकांनी शाळेवर धाव घेतली. हजेरीपट पाहले असता दोन्हीही विद्यार्थी वर्गशिक्षकांनी हजर दाखवलेले होते. दरम्यान, मुलांच्या मृत्यूची बातमी शाळा प्रशासनाच्या कानावर गेल्याने संबंधित वर्गशिक्षकांनी दैनंदिन हजेरी पटावर पी ऐवजी अशी नोंद करून पालकांची दिशाभूल केली.
बातम्या आणखी आहेत...