आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुडाल्याने दाेन चिमुकल्यांचा अंत, नातेवाइकांचा सर्वाोपचार रुग्णालयात अाक्राेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - रेनवाॅटर हार्वेस्टींगसाठी तयार केलेल्या शाेषखड्यातील पाण्यात बुडून दाेन चिमुकल्यांचा करूण अंत झाल्याची दुर्घटना रविवारी अादर्श काॅलनीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६मधील मैदानात घडली. सिद्धार्थ राजेश धनगावकर कृष्णा राकेश बहेल अशी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावं अाहेत.

खंडेलवाल लाॅन्स परिसरातील वसाहतीमध्ये राहणारे सिद्धार्थ धनगावकर कृष्णा बहेल हे रविवारी मनपा शाळा क्रमांक १६समाेर असलेल्या मैदानात पाेहाेचले. मैदानात रेन वाॅटर हार्वेस्टींगसाठी शाेषखड्डे तयार करण्यात अाले अाहते. मात्र खड्डे पूर्णपणे बुजवण्यात अालेले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी खड्यात साचले. या पाण्यात दाेन्ही चिमुलकले पडले. खड्यांमध्ये गाळ इतर बांधकाम साहित्यात ते फसले. पाण्याबाहेर पडता अाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. दाेन िचमुकल्यांना बाहेर काढून त्यांना सर्वेापचार रुग्णालयात भरती करण्यात अाले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. त्यामुळे चिमुकल्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फाेडला.

जबाबदारकाेण? :
जून-जुलै महिन्यात शहरात दमदार पाऊस झाला हाेता. त्यामुळे मनपा शाळा क्रमांक १६मधील मैदानाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले हाेते. शाेषखड्यांमध्येही पाणी साचले. काही िदवसांपूर्वी पाणी साचलेल्या परिसरातील नागरिकांनी नाली खाेदून पाण्याला वाट माेकळी करुन दिली हाेती. मात्र तरीही खड्यांमधील पाणी साचूनच राहिले. परिणामी हे दाेघेही िचमुकले जवळपास १० फूट पाण्यात पडले अाणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिक नगरसेवकांच्या मते खड्यांसाठी मनपाच्या जेसीबीची वापर करण्यात अाला. रेन वाॅटर हार्वेस्टींगसाठी जलवर्धन नामक स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे अाहे. अाता हे खड्डे बुजवण्याची, खड्यांमध्ये पाणी साचू नये, साचलेल्या पाण्याची याेग्य पद्धतीने िवल्हेवाट लावण्याची, दुर्घटना घडणार नाही, यासाठी उपाय-याेजना करण्याची जबाबदारी काेणाची हाेती, असे एक ना अनेक प्रश्न नागिरकांमधून उपस्थित करण्यात येत अाहेत.

एसडीअाेकरणार चाैकशी : पाण्यातबुडून चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची चाैकशी करावी, असा अादेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना तातडीने दिला. भविष्यात अाशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी काेणत्या उपाय याेजना करता येतील, हेदेखील प्रा. खडसे चाैकशी अहवाल सुचवणार अाहेत.

खडड्यांजवळचपला सायकल : मनपाशाळेच्या मैदानाजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्याजवळ दाेघेही चिमकले सायलकने पाेहाेचले. खड्याजवळ एक सायकल लहान मुलांच्या चप्पलांचे जाेडही अाढळून अाले.

लाेकप्रतिनिधींची धाव :
रेनवाॅटर हार्वेस्टींगसाठी तयार केलेल्या शाेषखड्यातील पाण्यात बुडून दाेन चिमुकल्यांचा करूण अंत झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच भाजप अामदार गाेवर्धन शर्मा, अामदार रणधीर सावरकर यांनी सर्वेापचार रुग्णालयात धाव घेऊन मुलांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले. दाेन्ही अामदारांनी मदतीचे अाश्वासनही दिले. खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवक बाळ टाले यांनी प्रशासनाला सांगितले हाेते. मात्र तरीही दुर्लक्ष का करण्यात अाले, असा सवाल अामदार सावरकर यांनी उपस्थित केला. त्यानंतर रिपाई (अाठवले गट) नेते गजानन कांबळे, राेहित वानखडे, युवराज भागवतकर,विजय टाेंपे यांनीही सर्वेापचार रुग्णालयात धाव घेऊन मुलांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

मुलाला करायचे हाेते अभियंता : कृष्णाहा गुरुनानक विद्यालयात इयत्ता ४मध्ये तर सिद्धार्थ हिंदू विद्यापीठमध्ये इयत्ता दुसरीत शिकत हाेते. मजुरी करुन संसाराचा गाढा हाकणाऱ्या त्यांच्या वडिलांना त्याला अभियंता करण्याचे स्वप्न उराशी बाळगले हाेते. मात्र या दुदैवी घटनेने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले.

गाेपीठाकरेंनी दिले पत्र :
शहरातिवविध ठिकाणी माेठे खड्डे असून, त्यामध्ये पाणी साचले अाहे. गाैरक्षण राेडवर एका ठिकाणी २० पेक्षा जास्त फूट खाेल खड्डा पडला अाहे. या खड्यात अातापर्यंत अनेक जनावरांचा बुडून मृत्यू झाला अाहे. त्यामुळे यासह सर्वच खड्डे बुजवण्याची मागणी नगसेवक गाेपी ठाकरे यांनी यापूर्वी मनपा प्रशासनाकडे लेखीस्वरुपात केली अाहे.

खेळाडूंकडूनचाैकशीची मागणी : मनपाशाळेच्या मैदानात राेज युवक क्रिकेट इतर खेळांसाठी येतात. या घटनेपूर्वीच खेळाडूंनी खड्डे बुजवण्याचा मागणी प्रशासनाकडे केली हाेती. यामध्ये माजी नगरसेवक पंकज साबळे, अमजद खान, जुबेर सिंघानिया, मुन्ना वरघट, सतीष ठाकूर, अजय शर्मा, माेंटू वरघट, जावेद अहमद, माे. इम्रान याचा समावेश हाेता.

स्वयंसेवासंस्थेने काम केले
रेनवाॅटर हार्वेस्टींगसाठी जलवर्धन नामक स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला हाेता. जागेची पाहणीही संस्थेने केली हाेती. याबाबतची माहिती मला देण्यात अाली नाही. खड्डे पूर्णत: बुजवण्यात अाले नाहीत. त्यामधील पाण्याचीही विल्हेवाट लावण्यात अाली नाही. हे काम पूर्ण करण्यात अाले नाही.
- कल्पना अजय गावंडे, नगरसेविका.
बातम्या आणखी आहेत...